टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारत सरकारच्या केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषद व भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्या तर्फे देण्यात येणारा
“राष्ट्रीय नाविण्यपूर्ण शेतकरी पुरस्कार- २०२३” हा पुरस्कार महा ऑरगॕनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशनचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांना जाहिर करण्यात आला आहे.
भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने दर वर्षी असे पुरस्कार देशभरातील नाविण्यपूर्ण व शेतकऱ्यांना दिशादर्शक काम करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो.
यापूर्वी ही पडवळे यांना केंद्र सरकार, राज्य सरकार व विविध स्वयंसेवी संस्था कडून विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पडवळे हे गटशेती, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन व सहकार्य करित असतात. तसेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न ते केंद्र व राज्य सरकार यांच्या कडे अभ्यासपूर्ण पणे मांडतात.
त्यांच्या या कामाचीच दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना हा राष्ट्रीय कृषी पुरस्कार जाहिर केला आहे.
सदर पुरस्कार पुसा संस्थेच्या मेळावा ग्राऊंड वर दि.२ ते ४ मार्च दरम्यान होणाऱ्या पुसा कृषी विज्ञान मेळाव्यात ४ मार्च ला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर व केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या हस्ते विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज