टीम मंगळवेढा टाईम्स ।
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियमात मंडळाच्या निवडणुकीत सोलापूरच्या नटराज पॅनलने सर्व सहा जागा मोठ्या मतांच्या फरकाने जिंकून रंगभूमी पॅनलवर दणदणीत विजय मिळविला आहे.
मंगळवेढ्याच्या तेजस्विनी कदम यांनी १४९५ मते मिळविली असून त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.
नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी नऊ वाजता सोलापूर, पंढरपूर, बार्शी आणि सांगोला येथील केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजता मतदान संपले.
रात्री आठ वाजेपर्यंत मतदानाचे आकडे येथे आल्यानंतर ७२.६६ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली.
सोलापूर केंद्रावर नटराज आणि रंगभूमी पॅनेलमध्ये चुरशीने मतदान झाले. क्रॉस वोटिंग होईल, असा अंदाज बांधण्यात येत होता, पण दोन्ही पॅनलमधील मतांचा फरक लक्षात घेता तितके क्रॉस वोटिंग झाले नसल्याचे स्पष्ट झाले.
नटराज पॅनलचे प्रा.अजय दासरी यांनी सर्वाधिक १५४७ मते मिळवून विजय संपादन केला. त्यानंतर विजय साळुंखे यांना १५३८ इतकी मते मिळाली.
मंगळवेढ्याच्या तेजस्विनी कदम यांना १४९५ मते तर पंढरपूरचे दिलीप कोरके यांनी १४९५ मते मिळविली. अकलूजचे विश्वनाथ आवड यांना १४९३ तर सोलापूरचे सुमित फुलमामडी यांनी १३७३ मते मिळवून विजय संपादन केला.
रंगभूमी पॅनलचे चारही उमेदवार साधारण ३०० ते ४८५ इतकेच मते मिळवू शकले. या पॅनलचे अरविंद अंदोरे यांना २९६, अनुजा मोडक यांना ३३१, गुरु वठारे आणि मीरा शेंडगे यांना अनुक्रमे ३१४ आणि ४८५ मते मिळाली. नाट्य परिषदेचे नियामक मंडळ ६० सदस्य आहेत.
नियोजनबद्ध प्रचार
नटराज पॅनलने गेल्या दोन महिन्यांपासून या निवडणुकीसाठी नियोजनबद्ध प्रचार केला. शहरातील प्रमुख सदस्यांना आपल्या बाजूने घेऊन दामले यांच्या बाजूने भूमिका जाहीर केली. दामले आणि किशोर महाबोले यांना बोलावून मेळावे आयोजित केले व मतदारांना साद घातली.सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केला.
रंगभूमी पॅनलने प्रत्येक सदस्यांशी संपर्क केला. वचननामा जाहीर केला. महत्वाचे मुद्दे मांडले, पण यश आले नाही.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज