मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा नगरपरिषद, मंगळवेढा अंतर्गत प्राथमिक प्राथमिक शिक्षण मंडळ, मंगळवेढा संचलित नगरपालिका कन्या शाळा क्रमांक १ या शाळेचे, राज्यस्तरीय बुद्धिवंत प्रज्ञाशोध परीक्षेत ११ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले.
इयत्ता तिसरीतील शुभ्रा सुभाष देशमुख हिने
गुणवत्ता यादीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला व प्रचिती नंदकुमार जाधव हिने राज्यात चौथा पटकावला.
तसेच राजवीर सतीश दत्तू केंद्रात दुसरा, समर नितीन पलुसकर केंद्रात ३ रा, आर्यन नितीन गोवे केंद्रात ५ वा, जान्हवी गणपत लेंडवे केंद्रात ५ वी, आरोही पोपट घुले केंद्रात ८ वा, वेदांत विनायक नेहरवे केंद्रात ८ वा, शिवम बालाजी दत्तू केंद्रात ९ वा, अनुप मल्लेशा अरकेरी केंद्रात १२ वा, श्रेयश विनोद जगदाळे केंद्रात १२ वा क्रमांक पटकावले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वर्गशिक्षक मारुती दवले सर, मारुती वाकडे सर, संजय चेळेकर सर तसेच मुख्याध्यापक अरविंद क्षीरसागर गुरुजी यांनी केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. प्राजक्ता ताड मॅडम, उपाध्यक्ष अॅड बापूसाहेब यादव साहेब, नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी, शाहू सतपाल साहेब,मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्ररचंडराव
तसेच नगरपालिका शिक्षण मंडळाचे सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक- शिक्षिका यांनी अभिनंदन केले.
नगरपालिका कन्या शाळा क्रमांक १, मंगळवेढा या शाळेचे व येथे शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. कारण काही दिवसांपूर्वी ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती.
काही वर्षांपूर्वी या शाळेचा फक्त ९ इतका कमी पट शिल्लक होता. परंतु आज या शाळेचा १०९ पट आहे. म्हणून या शाळेची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. कोरोना कालावधीत संपूर्ण जग घरात बसून होते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.
परंतू या शाळेतील शिक्षक श्री. मारुती दवले सर यांनी गुगल मिटिंगच्या माध्यमातून ऑनलाईन तासाचे नियोजन करून अनेक अडचणींवर मात करत ऑनलाईन वर्ग सुरू केले.
इयत्ता १ ली व दुसरी च्या दोन्ही वर्गांना शिक्षणाचे काम सुरू ठेवले. यामुळेच शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज