टीम मंगळवेढा टाईम्स।
सनरायझर्स हैदराबादने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला. त्यांनी 31 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली.
त्याने 20 षटकात 3 गडी गमावून 277 धावा केल्या. मात्र मुंबई इंडियन्सचा संघ 246 धावा करू शकला. हैदराबादकडून हेन्रिक क्लासेनने नाबाद 80 धावांची खेळी केली. मार्करामने नाबाद 42 धावा केल्या.
अभिषेक शर्माने 63 आणि ट्रॅव्हिस हेडने 62 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने चांगली फलंदाजी केली. त्याने 34 चेंडूत 64 धावा केल्या. नमन धीरने 30 धावांचे योगदान दिले.
टीम डेव्हिडने नाबाद 42 धावा केल्या. इशान किशन 34 धावा करून बाद झाला तर रोहित शर्मा 26 धावा करून बाद झाला. या पराभवाह मुंबईचा सलग दुसरा पराभव झाला आहे. तर हैदराबाद संघाने आपला पहिला विजय मिळवला आहे.
नऊ वर्षाचे रेकॉर्ड मोडले
आयपीएलच्या प्रत्येक पर्वात कोणता ना कोणता रेकॉर्ड मोडलेला तर नवीन एखादा रचलेला पाहायला मिळतो. मुंबई आणि हैदराबादमधील सामन्यामध्ये आयपीएल इतिहासामधील सर्वाधिक धावसंख्या असलेला रेकॉर्ड मोडला गेला आहे
हैदराबादच्या फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी करत हा महारेकॉर्ड रचला त्यांनीही वैयक्तिक विक्रम रचले आहेत.
आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाकडून सर्वात कमी बॉलमध्ये अर्धशतक करण्याचा विक्रम या सामन्यात रचला गेला आहे. याआधी हा विक्रम माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर याच्या नावावर होता. त्याने 2015 मध्ये सीएसके संघाविरूद्ध २० बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं.
हा विक्रम मुंबईच्या सामन्यात ट्रॅव्हिस हेड याने मोडला, अवघ्या 18 बॉलमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केलं होतं. मात्र काही वेळातच त्याचा हा रेकॉर्ड भारतीय युवा खेळाडूने मोडला आहे.
अभिषेक शर्मा याने अवघ्या काही मिनिटात त्याच सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या 16 बॉलमध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
अभिषेक शर्मा याने मुंबईविरूद्ध 23 बॉलमध्ये 63 धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 7 षटकार मारले. अभिषेकने एकाच ओव्हरमध्ये पियुष चावला याला तीन सिक्स मारले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज