मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । वीजेचा धक्का बसून आई आणि मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.वाळत घातलेले कपडे काढायला गेल्यानंतर तारेमध्ये असलेल्या वीजेच्या प्रवाहाने ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
अजय गणेश गंजी (वय 25), शशिकला गणेश गंजी (वय 45, रा. रविवार पेठ, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. शशिकला गंजी या आज रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरासमोर वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी गेल्या होत्या. ज्या तारेवर कपडे होते, त्या तारेमध्ये विजेचा प्रवाह उतरला होता. वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने शशिकला या खाली कोसळल्या. आईला वाचवण्यासाठी मुलगा अजय धावून गेला.
त्यावेळी त्यालाही विजेचा धक्का बसला. दोघेही बेशुद्ध पडले. दोघांना तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीत झाली आहे.या दुर्दैवी घटनेने परिसरात मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज