टीम मंगळवेढा टाईम्स ।
महिला शासकीय कर्मचाऱ्यांना लग्नाआधी आपल्या आई-वडिलांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च सरकारकडून मिळतो. मात्र, लग्नानंतर सासू- सासऱ्यांचीही जबाबदारी त्यांच्यावर येण्याची शक्यता असते.
अशा परिस्थितीत या महिलांना आता आई- वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एकाचीच निवड त्यांचा वैद्यकीय खर्च शासनाकडून मिळविण्यासाठी करावी लागणार आहे. याविषयीचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आई-वडील किंवा सासू- सासरे यांच्यापैकी एका कुटुंबाची नोंद सेवा पुस्तिकेत करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.
यापैकी एकाची निवड करून ते आपल्यावर अवलंबून असल्याचे पुरावे सरकारला सादर करावे लागणार आहेत. या पुराव्यांमध्ये अद्ययावत रेशनिंग कार्डाची प्रत तसेच नोंदणीकृत शपथपत्र सोबत जोडावे लागणार आहे.
महिला कर्मचाऱ्यांनी विवाहानंतर अविवाहित महिलांना मात्र अशाप्रकारे सेवा पुस्तकात कोणतीही नोंद करण्याची आवश्यकता नाही, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज