टीम मंगळवेढा टाईम्स ।
इंदापूर येथील श्री. नारायणदास रामदास हायस्कूलमधील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
प्रथमेश विकास खबाले (वय १६, रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ होत आहे.
दररोजच्या प्रमाणे शाळेत आल्यानंतर शाळेच्या प्रांगणात सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर हा विद्यार्थी वर्गात गेला. त्यानंतर बाकावर बसल्यानंतर त्याला चक्कर आली.
शिक्षकांनी त्याला तत्काळ मोकळ्या हवेला आणले. त्या ठिकाणी रिक्षा बोलावून रिक्षामधून त्याला इंदापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला आहे.
विद्यार्थ्याला अचानक चक्कर आल्यानंतर संस्थेतील सर्वच शिक्षक त्या विद्यार्थ्याकडे धावले. तो बेशुद्ध अवस्थेत होता. शिक्षकांनी त्याचे हृदयदेखील पंपिंग करण्याचा प्रयत्न केला आणि तत्काळ त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयातही
हलवले. मात्र, डॉक्टरांच्या आणि शिक्षकांच्या प्रयत्नांना यश आले नाही. या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शाळेतील शिक्षकांनादेखील अश्रू अनावर झाले. तातडीने संस्थेने शाळेला सुट्टीदेखील जाहीर केली. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात शिवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज