मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तम जानकर यांनी बॅलेट पेपरवर विधानसभा निवडणूक घेण्याच्या अटीवर आमदार पदाचा राजीनामा निवडणूक आयोगाकडे सादर केला. तशा आशयाचे राजीनामापत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यात भाजपच्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा अधिक मतदान झाले होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेत आ. जानकर यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती.
तसेच मारकटवाडी या गावात मतदान प्रक्रियेविरोधात नागरिकांनी आवाज उठवला होता. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती. मात्र, हे आंदोलन अधिकच चिघळल्यामुळे तो विषय मागे पडला.
मात्र आ.उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या राजीनाम्यामध्ये बॅलेट पेपरवर विधानसभा निवडणूक घ्यावी; अन्यथा ईव्हीएम मशीनमधील चिठ्या नागरिकांच्या हातात देऊन पुन्हा त्या जमा करून घेण्याच्या अटीवर राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे.
तसेच या राजीनामा पत्रावर तारीख १८ जानेवारी २०२४ अशी आहे. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच दिला आहे का, याविषयी उलटसुलट चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
आपण व माजी आमदार बच्चू कडू असे दोघे जण २३ जानेवारी रोजी दिल्ली येथे जाणार असून, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या किंवा ईव्हीएम मशीनमधील चिठ्ठयांना मोजण्याची परवानगी द्या, अशी मागणी आपण करणार आहोत.
आम्हाला पारदर्शक निवडणूक हवी असल्याने आपण आपला राजीनामा निवडणूक आयुक्तांकडे सादर करणार आहे, असे आमदार उत्तमराव जानकर यांनी बोलताना सांगितले.
जानकर यांनी नौटंकी बंद करावी – सातपुते
एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसेल तर अज्ञान दाखवू नये. आमदाराने राजीनामा निवडणूक आयोगाकडे नव्हे, तर विधानसभा अध्यक्षांकडे द्यायचा असतो. हिंमत असेल तर आमदार उत्तमराव जानकर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा द्यावा. आम्ही निवडणुकीला तयार आहोत. होऊन जाऊ द्या, नौटंकी बंद करा, अशी प्रतिक्रिया माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज