mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गॅरंटी! पाण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची आमदार समाधान अवताडे यांची ग्वाही; मोठ्या पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्याबाबतचा प्रस्ताव

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 4, 2024
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

म्हैसाळ योजनेच्या मूळ आराखड्यामध्ये शिरनांदगी, मारोळी, लवंगी या तलावाचा समावेश नाही. त्यामुळे या तलावाचा समावेश करून या भागाला पाणी कमी पडणार याची काळजी घेऊ आणि जर पाणी कमी पडत असेल तर ते वाढवून कसे घेता येईल याकडे लक्ष देऊन तुम्ही फक्त सुचवत रहावा.

मी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही आमदार समाधान अवताडे यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील म्हैसाळ योजनेतील 19 गावातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी संदर्भातील बैठक सलगर बुद्रुक येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यकारी अभियंता सचिन पवार, उपकार्यकारी स्वप्नील गोसावी, अजिंक्य जाधव, शाखा अभियंता महेश पाटील यांच्यासह भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, जि. प.चे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रा. येताळा भगत, आंबादास कुलकर्णी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

आतापर्यंत अनेक पिढ्या दुष्काळात गेल्या. आता आमची पिढीही चालली आहे. दुष्काळात जन्मलो. दुष्काळात मरणार नाही, भिष्मप्रतिज्ञा घेऊन मी काम करतोय. अडीच वर्षांच्या कार्यकाळात लोकप्रतिनिधी म्हणून मला जेवढा निधी खेचून आणता येईल त्यापेक्षा अधिकचा निधी खेचून आणला.

मात्र आपल्या भागाचा बॅकलॉग मोठा असल्यामुळे पाणी, रस्ते, वीज यासाठी अधिकचा निधी मिळण्याची प्रयत्न माझे सुरू आहेत, असे समाधान आवताडे म्हणाले.

ज्या योजनेचे पाणी तालुक्याला कधीच प्रस्तावित नव्हते त्या टेंभू योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्याला आणून दाखवण्याचे काम मी केले. उमदी परीसरात पाणी सहजरित्या उपलब्ध होते. मात्र शेवटच्या टोकाला असलेल्या आमच्या भागात पाणी उपलब्ध होण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्याबाबतचे योग्य नियोजन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

शिरनांदगीचे गुलाब थोरबोले यांनी म्हैसाळ योजनेच्या वितरिकेतून तलावात स्वतंत्र लाईनने पाणी सोडण्याची, ओढ्यावरील बंधारे भरून देण्याची मागणी केली. येळगीचे सचिन चव्हाण व सोड्डी शांताप्पा बिराजदार यांनी शेवटच्या टोकावर असलेल्या गावाला पाणी मिळत नाही. पाणी पोहोचवण्याची मागणी केली.

यावर आमदार समाधान आवताडे यांनी लवंगी, पडोळकरवाडी, शिरनांदगी या तलावात मुख्य वितरिकेतून मोठ्या पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पाठवला असून

लवकर त्याला मंजुरी मिळणार असल्याची सांगून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यासाठी संपादित झाल्या त्यामधील तीन गावाचे पैसे प्रांत कार्यालयाकडे आलेले आहेत तर उर्वरित गावाच्या भूसंपादनासाठीचा निधी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिल्या.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: समाधान आवताडे

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकरांनो! गॅसची ‘ई-केवायसी’ त्वरित करा, अन्यथा सबसिडी होईल बंद; ​शांतीसागर इंडेन गॅस कंपनीने नागरिकांना केले आवाहन

February 25, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग; शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन; आमदार आवताडेंचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार

February 22, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

February 19, 2026
Next Post
भयंकर! अवैध सावकारांच्या जाचाला कंटाळून मंगळवेढ्यात तरुणाची आत्महत्या; व्याजाच्या पैशाच्या बदल्यात केली जमीनीची मागणी; तीघांविरूध्द गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यात ज्वारी काढणीचे काम करून घराकडे परतत असलेल्या एकाला भरधाव वाहनाची धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा