मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क |
मंगळवेढा तालुक्यातील मारापूर येथील विविध कार्यकारी सोसायटीवर आमदार समाधान आवताडे गटाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असून, सरपंच विनायक यादव यांच्या नेतृत्वाखालील गटाचे सर्व सदस्य विजयी झाले आहेत.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंच विनायक यादव यांनी थेट सरपंचपद होते. त्यानंतर काल झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब झाला आहे.
या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण १३ पैकी दोन उमेदवार हे यापूर्वीच बिनविरोध झाले होते. काल ११ जागांसाठी सकाळी सात ते चार या वेळेत मतदान घेण्यात आले.
व मतदानानंतर लगेच मतमोजणी घेण्यात आली. यामध्ये आमदार समाधान आवताडे यांच्या गटाचे सर्व संचालक विजयी झाले.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंच विनायक यादव यांनी थेट सरपंचपद स्वीकारल्यानंतर गावात वेगवेगळे उपक्रम राबविले. त्याचा फायदा त्यांना सोसायटीच्या निवडणुकीत झाला.
तुळशीराम माने व भारत सातपुते हे बिनविरोध झाले, तर उर्वरित ११ जागांवर नंदकुमार आसबे (२५५), नवनाथ आसबे (२५७), राजाराम आसबे (२५५), अशोक यादव (२५७) बाळासाहेब यादव (२५५), महेश यादव (२५४),
परमेश्वर यादव (२५९), राजकुमार यादव (२५९), अमोल जानकर (२७४), दीपाली आसबे (२६७) व अर्चना माने (२६४) विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. बी. गायकवाड यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज