टीम मंगळवेढा टाईम्स ।
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दावल इनामदार यांनी मंगळवेढा शहरातील आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये समर्पक आणि प्रामाणिक भावनेने कार्य करून रुग्णांची सेवा केली आहे.
आरोग्यसारख्या सेवा क्षेत्रांमध्ये आर्थिकदृष्ट्या व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता मानवतेचा धर्म जपत इनामदार यांनी पत्रकरिता करत आतापर्यंत केलेली सेवा ही मेट्रोपॉलीस व इनामदार क्लीनिकल लॅबोरेटरी या आरोग्य दालनाच्या मार्फत आणखी उठावदार पणे आपणास दिसेल.
इनामदार परिवाराची या क्षेत्रातील यशाची कमान उत्तरोत्तर अशीच बहरत जावो अशा शुभेच्छा प्रांताधिकारी समिंदर यांनी यावेळी बोलताना दिल्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील बोलताना म्हणाल्या की, अनेक संतांच्या वास्तव्याने आणि पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मंगळवेढा शहरांमध्ये इनामदार बंधू यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत आरोग्य सेवेचे व्रत अखंडितपणे सुरू आहे.
आपल्या सर्वांच्या सेवेत साकार होत असलेल्या मेट्रोपॉलीस व इनामदार क्लीनिकल लॅबोरेटरी या आरोग्य दालनाच्या माध्यमातून शहराच्या भौतिक आणि आरोग्य सुविधांचे वैभव वाढण्यास खूप मोठी मदत होईल असे मत विभागीय पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांनी व्यक्त करून या नवीन व्यावसायिक वाटचालीस इनामदार परिवाराला शुभेच्छा दिल्या.
तहसीलदार स्वप्नील रावडे म्हणाले, आपल्या संस्कृतीतील सुभाषित म्हणजे आरोग्यम् धनसंपदा परंतु खऱ्या अर्थाने आपल्या आरोग्याची संपदा संतुलित ठेवायचे असेल तर आपल्या शरीराची वेळोवेळी योग्य आरोग्य दालनामध्ये तपासणी अथवा चाचणी करून आपले शारीरिक संतुलन बाधित ठेवले पाहिजे.
आत्तापर्यंत मंगळवेढा शहरातील रुग्णांना वेगवेगळ्या चाचण्या व तपासण्या करण्यासाठी बाहेरील शहराकडे जावे लागत असत. प्रसंगी आर्थिक कोंडी असताना सुद्धा बाहेरील शहरांमध्ये महागड्या आरोग्य चाचण्या करणे हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नव्हते.
अशा परिस्थितीमध्ये इनामदार परिवाराने सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन उभ्या केलेल्या अद्यावत लॅबमुळे येथील रुग्णाला खूप मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.मधुकर कुंभारे बोलताना म्हणाले की,
मेट्रोपोलीस लॅबची सेवा झाल्यामुळे आता पंढरपूर सोलापूरला न जाता मंगळवेढा येथे चांगली सेवा मिळणार असून अनेक प्रकारच्या रक्त चाचणीची सेवा उपलब्ध झाली आहे त्यामुळे आम्हास आता निदान करणे सोफे झाले आहे.
पोलीस निरीक्षक रणजीत माने, डॉक्टर पुष्पांजली शिंदे, डॉ अतुल निकम,नूतन प्रशासकीय अधिकारी रोहित भगरे आदींनी लॅब संबंधी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी श्रीनिवास कोरुलकर,डॉ अतुल निकम, डॉ पुष्पांजली शिंदे, नूतन प्रशासकीय अधिकारी रोहित भगरे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड, डी.के दत्तू सर ,सभापती सोमनाथ अवताडे,संपादक दिगंबर भगरे, समाधान फुगारे, नगरसेवक अजित जगताप , प्रवीण खवतोडे,राहुल ताड, सत्यजीत सुरवसे ,सचिन शिंदे,युवराज घुले,
डॉ.लक्ष्मीकांत मर्दा, डॉ. नितीन चौंडे, डॉ शरद शिर्के, डॉ. महेश कोनळी, डॉ नितिन आसबे, डॉ संतोष मेटकरी, डॉ.कश्मिरा रत्नपारखी,डॉ.सुरवसे,डॉ. डॉ.दत्तात्रय क्षीरसागर,डॉ.काशिनाथ वाले,डॉ.प्रदीप डोके,डॉ.बी के पडवळे,विजय बुरकुल,बाबा कोंडूभैरी,भीमराव मोरे, शरण बिरादार,प्रशांत शिंदे,अजित राजमाने,
विलास पाराध्ये,अड रमेश जोशी,जयेश कांबळे,धनंजय डोंगरे सर,अंबादास बेंद्रे,संतोष रनदवे, भारत शिंदे, सादिक शेख,विजय सोड्डे, माजीद शेख,रघुनाथ शिवशरण,शंकर कोकरे,मधुकर घुले,चंद्रकांत बेदरे , मल्लिशा कोळी,अतुल पाटील,इलियास चौधरी,नितीन घुले, सौरभ रत्नपारखी,पांडुरंग घाडगे,पत्रकार शिवाजी पुजारी,
माऊली भगरे, हुकूम मुलाणी,मल्लिकार्जुन देशमुखे, प्रमोद बिनवडे, विलास मासाळ ,औदुंबर डावरे, प्रवीण गांडुळे, बाळासाहेब नागणे,महादेव धोत्रे, श्रीकांत मेलगे, सचिन हेंबाडे,राज महंमद इनामदार,सत्तार इनामदार,रफीक इनामदार, बबलू काझी,सचिन यादव, राजाभाऊ आकळे,
जमीर मुजावर,शरद गायकवाड़,प्रशांत होड़गे,अमोल राजमाने,आलीफ सुतार,शक्ति ताड, महफूज इनामदार,साजिद इनामदार,साहिल इनामदार,वसीम इनामदार,मुजीब रोंगीकर, अकिल पटेल,बबलू पटेल ,अकरम मुलानी आदिल मुलानी आदि मोठ्या संख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नसीर शेख व सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले तर
आभार दावल इनामदार यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज