टीम मंगळवेढा टाईम्स ।
स्व.भारत नाना भालके करिअर अकॅडमी बालाजीनगर मध्ये आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालाजी नगरचे सुपुत्र सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी.मच्छिंद्र तोलाराम पवार, अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पवार सर, माजी सरपंच हरिचंद्र राठोड, उद्योजक वसंत राठोड, संस्थेचे संचालक सचिन राठोड, भिमराव पवार गुरुजी व संस्थेचे सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सुरेश पवार गुरुजी यांनी जवळपास सव्वा तास आपल्या अत्यंत प्रभावी मनोगतातून छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडला.
यावेळी सर्व पाहुण्यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
आज शिवजयंतीच्या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्याने शिवरायांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या आयुष्याचे तोरण उभे केले पाहिजे आपण आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिले पाहिजे. असे विचार यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पवार सर यांनी मांडले.
आयुष्य लहान नसतं आपण जगायला उशिरा सुरुवात करतो म्हणून प्रत्येक प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी मन लावून शिवरायांच्या मावळ्या सारखे एकसंघ एकजुटीने तयारी करा आणि या देशाची सेवा करा अशा प्रकारचे वक्तव्य सेवानिवृत्त डी .वाय. एस.पी. एम टी पवार यांनी मांडले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज