टीम मंगळवेढा टाईम्स।
जर्मनीच्या जागतिक कृषि प्रदर्शनात मंगळवेढा तालुक्यातील पाटखळचे तात्यासाहेब चव्हाण व त्यांच्या पत्नी महानंदा चव्हाण या शेतकरी जोडप्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जर्मनी येथे कृषी यंत्रांसाठी जगातील सर्वात मोठे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नवीन मशीन आणि तंत्रज्ञानासाठी सॅप पार्ट ग्रुप सहभागी झाला होता.
तंत्रज्ञान, डिस्क हॅरो, इंटिग्रेटेड हब सील तंत्रज्ञान या प्रदर्शनावेळी सदर ग्रुपच्या वतीने चव्हाण दांपत्याची भारतीय शेतकरी म्हणून निवड केली होती.
शेतकऱ्यांची निवड ही स्टॉलची मध्यवर्ती थीम असून मंगळवेढ्याचे शेतकरी जोडपे हे भारताचे प्रतिनिधी म्हणून स्क्रीनवर झळकले. अस्सल शेतकऱ्याची वेषभूषा यावेळी लक्षवेधी ठरली.
तात्यासाहेब चव्हाण हे बळीराजा पतसंस्थेचे संचालक असून त्यांना शेतीविषयक विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांनी अनेक देशांचे कृषिविषयक अभ्यास दौरे केले असून शेतकऱ्यांना ते सतत शेतीविषयक मार्गदर्शन करीत असतात.
ठळक मुद्दे;-
जर्मनी येथे AGRITECHNICA-Hannover प्रदर्शन – कृषी यंत्रांसाठी जगातील सर्वात मोठे प्रदर्शन. नवीन मशीन आणि तंत्रज्ञान- सॅप पार्टचा सहभाग- तंत्रज्ञान- डिस्क हॅरो- इंटिग्रेटेड हब सील तंत्रज्ञान. प्रदर्शनात
माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते कृषीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित केलेले आहे तसेच बळीराजा मासिक यांचा उत्तम शेतकरी दैनिक दामाजी एक्स्प्रेस चा उत्कृष्ट शेतकरी अशा पुरस्काराने त्यांना गौरविलेले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज