टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील जालिहाळ येथे पौर्णिमा बाळू जावीर (वय २२) ही विवाहिता सकाळी ६.२५ वाजण्याच्या पुर्वी विहिरीतील पाण्यात पडून मयत झाल्याची खबर सदर मयत विवाहितेच्या आईने मंगळवेढा पोलिसांत दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढा येथील कमल मच्छिंद्र कांबळे यांची मुलगी पौर्णिमा ही दि.३ मे रोजी सकाळी ६.२५ वाजण्याच्या पुर्वी सासरी जालिहाळ येथील विहिरीतील पाण्यात पडली आहे.
असे जावई बाळू याने कमल कांबळे यांचा मुलगा अनिल यांच्या फोनवर फोन करून कळविले.
त्यानंतर लगेच माहेराकडील मंडळी जालिहाळ येथील वस्तीजवळील विहिरीवर जावून पाहिले असता मुलगी पौर्णिमा ही उताणे स्थितीत पडलेली होती.
तीच्या शरीरास हात लावून तीला उठविण्याचा प्रयत्न केला असता तीच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. तीच्या नाका तोंडातून फेस येत होता.
त्यावेळेस याबाबत बाळू जावीर याचेकडे विचारपूस केली असता त्यानी पौर्णिमा हिस आम्ही गावातील लोकांच्या मदतीने विहिरीतील पाण्यातून काढून वरती झोपवले आहे.
त्यानंतर सदर मुलगी मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर आई कमल कांबळे यांनी मंगळवेढा पोलिसात खबर दिली.
पोलिसांनी सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसो पिंगळे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज