टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच मंगळवेढा तालुक्यात विवाहितेच्या आत्महत्येने हुंडाबळीची घटना समोर आली आहे.
माहेरहून पैसे आन तसेच हुंड्यात सोन्याचे दागिने आणावेत म्हणून सासरकडील नातेवाइकांनी छळ केल्याने महिलेने रहात्या घरी बेडरुमच्या छताचे हुकास ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गडदेवस्ती नंदेश्वर ता. मंगळवेढा येथे काल सकाळी 11.45 च्या पूर्वी घडली.
महिलेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सासु शोभा शिवाजी गडदे, सासरे शिवाजी काशीनाथ गडदे, दिर समाधान शिवाजी गडदे, पती दिपक शिवाजी गडदे सर्व (रा.गडदेवस्ती नंदेश्वर ता.मंगळवेढा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मयत ज्ञानेश्वरीचे वडिल किसन सोमा मासाळ (वय 55 रा.मासाळवस्ती गोणेवाडी ता मंगळवेढा) यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत ज्ञानेश्वरी दिपक गडदे (वय 20) ही मूळची गोनेवाडी गावातील आहे. तिचा गेल्या वर्षी (2024) मे महिन्यात दीपक शिवाजी गडदे याच्याशी विवाह झाला होता.
विवाहात ज्ञानेश्वरीच्या कुटुंंबीयांनी हुंडा व सोने दिले नव्हते, त्यामुळे सासरकडील वरील आरोपी ज्ञानेश्वरीला आई-वडिलांसोबत बोलू देत नव्हते व मानसिक त्रास देत होते.
विवाहानंतर काही महिन्यात पती दीपक, सासू शोभा, दीर समाधान, सासरे शिवाजी यांनी हुंड्यात पैसे, तसेच दागिने दिले नसल्याचे सांगून तिचा छळ सुरू केला. तिला टोमणे मारण्यात आले. आरोपींनी माहेरहून पैसे हुंडा घेऊन येण्याची मागणी केली.
छळामुळे ज्ञानेश्वरीने दि.10 सप्टेंबर रोजी राहत्या घरी बेडरुमच्या छताचे हुकास ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्यासाठी मुलीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद ज्ञानेश्वरीच्या वडिलांनी नुकतीच दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक लातूरकर हे तपास करत आहेत.
दरम्यान, गुन्हा दाखल करण्यासाठी मयत ज्ञानेश्वरीच्या नातेवाईकांनी सोलापूर येथून शवविच्छेदन करून ज्ञानेश्वरीला थेट पोलीस ठाण्याच्या आवारात ॲम्बुलन्स आणण्यात आली होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज