टीम मंगळवेढा टाईम्स ।
रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांशी का बोलते म्हणत संशय घेऊन खोलीत कोंडून डोळ्यात काळे तिखट टाकून विवाहितेला पाईपने मारहाण केली .
याप्रकरणी सांगोला पोलिसांनी पती, दिरासह सासू- सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सकाळी ६ च्या सुमारास सांगोला तालुक्यात बामणी येथे ही घटना घडली.
या प्रकारानंतर निशा श्यामराव इंगोले ( रा . बामणी , ता . सांगोला ) हिने फिर्याद दिली . पोलिसांनी पती श्यामराव , सासू कमलाबाई , सासरे सुखदेव , दीर एकनाथ इंगोले या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बामणी येथील निशा इंगोले यांचा पती श्यामरावने झोपेतून उठून पत्नी निशाला खोलीमध्ये बोलावून घेतले. लगेचच पाठीमागे सासू , सासरे , दीर त्यांच्या खोलीत आले.
सासूने खोलीला आतून कडी लावून तिला कोंडले. यावेळी पती श्यामराव याने पत्नी निशा हिला तू येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी बोलत का उभी राहते म्हणत तिच्यावर संशय घेऊन लोखंडी पाईपने पायावर मारहाण केली.
ती जोरजोरात ओरडत असताना दीर एकनाथ याने डब्यातील काळे तिखट घेऊन भावजईच्या डोळ्यात टाकले. ती खाली पडली आणि पती श्यामराव याने पुन्हा लोखंडी पाईपने मारहाण केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज