टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा परिषदेने स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील मुलींसाठी सायकल बँक सुरू केली आहे.
सीईओ दिलीप स्वामी यांनी स्वतः एक सायकल देऊन या बँकेची सुरुवात केली. जिल्ह्यात पहिल्यांदाच सायकल बँक स्थापन करून ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या मुलीसाठी केलेली ही मदत खूपच चांगली ठरली आहे.
मारापुर परिसरामध्ये मुलींना शाळेत जाण्यासाठी वाहनांची सोय नाही. तसेच अनेक मुलींकडे सायकल नसल्यामुळे त्या शाळेत जाऊ शकत नाहीत व त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
हे थांबविण्यासाठी मारापुर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच व माणगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायक यादव यांनी सायकल बँक हा उपक्रम मारापुर ग्रामपंचायत मार्फत अत्यंत प्रभावीपणे राबविणार असल्याचे सांगितले.
ते दामाजी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभाला उत्तर देताना बोलत होते.
यापुढे बोलताना त्यांनी सोमवारी स्त्री जन्माचा जागर यासाठी प्रभात फेरी काढणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी राजकुमार यादव, भगवान आसबे, बाळासाहेब यादव, उपसरपंच अशोक आसबे, डॉ.सत्यवान यादव नंदकुमार आसबे, बालाजी यादव, संतोष गांडुळे व सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब इंगोले यांनी तर आभार बाळासाहेब यादव यांनी मांडले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज