टीम मंगळवेढा टाईम्स।
येणाऱ्या काळात समृद्धी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू शेतकरी, उद्योजक व महिलांसाठी वेळोवेळी मदत करावी असे प्रतिपादन सीमाताई परिचारक यांनी केले.
जीवनाच्या वाटेवरून प्रवास करीत असताना प्रत्येक स्त्रीने बाहेरच्या जगात सामर्थ्य शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधले पाहिजे असे मत डॉ प्रणिताताई भगीरथ भालके यांनी व्यक्त केले त्या जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अजित रामचंद्र जगताप यांच्या संकल्पनेतून मंगळवेढा शहरात नव्याने सुरू झालेल्या
समृद्धी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा उदघाटन समारंभ प्रसंगी बोलत होत्या यावेळी प्रमुख पाहुण्या सीमाताई परिचारक, डॉ प्रिती शिंदे,अध्यक्षस्थानी मधुमती दिपकआबा साळुंखे-पाटील उपस्थित होत्या.
सुरवातीस मधुमती साळुंखे-पाटील व सीमाताई परिचारक यांच्या हस्ते पतसंस्थेचे उदघाटन करण्यात आले यावेळी भालके पुढे म्हणाल्या प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते त्याप्रमाणेच यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री सुध्दा तितक्याच ताकदीने उभी असते
अजित जगताप यांच्या पाठीशी त्यांच्या मातोश्री चेअरमन आशादेवी जगताप व वडील रामचंद्र जगताप खंबीरपणे उभे आहेत म्हणूनच आज मंगळवेढ्यात समृद्धी पतसंस्थेच्या माध्यमातून एक उत्तम असे सहकार मंदीर उभे राहत आहे
याचा आनंद आहे सदरची पतसंस्था निश्चितच पारदर्शक कारभार करून लवकरच नावलौकिक प्राप्त करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या
यावेळी शोभा काळुंगे,शैलजा सावंत,आशा नागणे,निला आटकळे,मनिषा जाधव,शुभदा पटवर्धन,निर्मला माळी,हर्षदा सुरवसे,विजया देशमुख,श्रद्धा पवार, धनश्री कापशीकर,आरती पुजारी,जयश्री हावनाळे,अरूणा दत्तू,लक्ष्मीबाई वाकडे,साहेरा काझी,
अपर्णा हजारे चेअरमन आशादेवी जगताप,व्हाईस चेअरमन कोमल शिंदे,सल्लागार सुप्रिया जगताप यांचेसह सर्व संचालक मंडळ महिला भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी शक्तीचे नावच नारी आहे या विषयावरती डॉ प्रिती शिंदे कोल्हापूर यांनी आपल्या व्याख्यानातून स्त्री सामर्थ्याची ओळख करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले तर आभार संचालिका रूपाली कलुबर्मे यांनी मानले
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज