टीम मंगळवेढा टाईम्स।
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन सर्वांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी २४ डिसेंबर ही मुदत देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर, जरांगे-पाटील यांनी पुन्हा राज्यात गावभेट दौरा सुरू केला आहे.
त्यांच्या या दौऱ्यात करमाळा तालुक्याचा समावेश असून या तालुक्यातील वांगी येथे बुधवारी (ता. १५) सायंकाळी ७ वा. सभा होणार आहे.
या दौऱ्यात ते रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना तर तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत. आंतरवाली सराटी येथे सुरू केलेले उपोषण शासनाला २४ डिसेंबरपर्यंत मुदत देत मागे घेतले होते. याचवेळी तिसऱ्या टप्यातील आंदोलन शासनाला परवडणार नाही इशारा देखील दिला होता.
या धर्तीवर जरांगे-पाटील हे तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाच्या तयारीला लागले असून १५ तारखेपासून आंतरवाली सराटी येथून त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात होणार आहे. त्यांचे सहकारी प्रदीप सांळुखे हे नियोजन करत असून त्यांना श्रीराम कुरणकर, संजय कटारे, पांडुरंग तारख, धनंजय दुफाके, डॉ. रमेश तारख हे सहकार्य करत आहेत.
मनोज जरांगे-पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला तूर्त विराम दिलेला असला तरी हा पूर्ण विराम नाही. बुधवारीच ते सोलापूर जिल्ह्यात आहेत. त्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात १ डिसेंबरपासून पूनम गेट येथे पुन्हा साखळी उपोषण सुरू करण्यात येत आहे.- माऊली पवार, समन्वयक, सकल मराठा समाज
असा असेल दौरा…..
■ ता. १५ आंतरवाली – वाशी- परंडा- करमाळा
■ ता. १६ करमाळा- दौंड मायणी
■ ता. १७ मायणी सांगली – कोल्हापूर- इस्लामपूर- कराड
■ ता. १८ कराड- सातारा-मेढा- वाई- रायगड
■ ता. १९ रायगड दर्शन- पाचाड-महाड दर्शन- मुळशी आळंदी
■ ता. २० आळंदी – तुळापूर-पुणे- खालापूर- कल्याण
■ ता. २१ कल्याण-ठाणे-पालघर- त्रिंबकेश्वर
■ ता. २२ त्रिंबकेश्वर – विश्रांतगड- संगमनेर- श्रीरामपूर ■ ता. २३ श्रीरामपूर – नेवासा- शेवागाव- आंतरवाली सराटी.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज