टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोनाने आपली पकड घट्ट केली असून शहरातील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण बळींची संख्या 27 झाली आहे तर कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 257 वर गेली आहे.
शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज पुन्हा 17 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज तब्बल 20 जणांना उपचारानंतर घरी सोडणेत आलेले आहे.
आज दि.6 ऑक्टोबर रोजी नागरिकांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत.तसेच आज 56 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 56 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 14 आणि निगेटिव्ह 42 जणांचे अहवाल आलेले आहेत.सदरचे नागरिक हे मंगळवेढा 7 , सलगर बु . 3 , निंबोणी 2 , ब्रम्हपुरी 2 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे 03 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.सदरचे नागरिक हे मंगळवेढा 1 , खडकी 1 , भोसे 1 येथील कोरोना रूग्णांच्या निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 257 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 1 हजार 101 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 129 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Mangalwedha taluka Twenty-seventh victim of Corona ; Today, 20 people are free from corona
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज