mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कौतुकास्पद! मंगळवेढा प्रांताधिकारी,तहसीलदार यांच्या प्रयत्नामुळे तालुक्‍यातील ऍक्‍टिव्ह रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कौतुकास्पद! मंगळवेढा प्रांताधिकारी,तहसीलदार यांच्या प्रयत्नामुळे तालुक्‍यातील ऍक्‍टिव्ह रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट!

 

टीम मंगळवेढा टाईम्स । एकीकडे सोलापूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी जास्त होत असली तरी मंगळवेढा तालुक्‍यातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या शंभराच्या आत आल्यामुळे मंगळवेढा तालुक्‍यासाठी शुक्रवारचा दिवस दिलासादायक ठरला आहे. 


आजअखेर तालुक्‍यातील कोविड सेंटरमध्ये 99 रूग्ण उपचार घेत असून इतर रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.शुक्रवारी तालुक्‍यात 81 जणांची रॅपिड अँटीजने टेस्ट घेण्यात आल्या. यात 19 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. 

यात मंगळवेढा, सलगर बुद्रुक, लवंगी, चोखोमेळा नगर, ब्रम्हपुरी, आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी, बावची या गावात 14 रुग्ण सापडले तर सोलापूरला पाठवलेल्या स्वॅबमध्ये पाच जण पॉझिटिव्ह सापडले असून त्यामध्ये मंगळवेढा 4 आणि ब्रह्मपुरी येथील एकाचा समावेश आहे.

आजअखेर मंगळवेढा शहर व तालुक्‍यात 1 हजार 296 रूग्ण सापडले तर आज 33 रुग्णांना कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. तर 99 रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत तालुक्‍यात 29 जणांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवेढा तालुक्‍यामध्ये पहिला रुग्ण पाटकळ येथे सापडल्यामुळे नागरिकाची कोरोनाच्या भितीने गाळण उडाली होती. अशा परिस्थितीत तालुक्‍यात आरोग्य व महसूल, पोलिस प्रशासन यामध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना कोरोनाची वाढणारी साखळी नियंत्रित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले व तहसीलदार स्वप्नील रावडे, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी कष्ट घेत तालुक्‍यामध्ये रुग्णाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी प्रयत्न केला. 

त्यांच्या प्रयत्नाला यशही आले. विशेषत: उपविभागीय अधिकारी उदय भोसले हे पॉझिटिव्ह येऊन देखील सातत्याने प्रयत्नशील राहिले. त्यामुळे आता तालुक्‍यातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या शंभराच्या आत आली आहे. त्यामुळे तालुक्‍यासाठी हे आशादायक आहे.

मंगळवेढा शहरातील व्यापाऱ्यांनी मास्क असेल तरच माल मिळेल, अशी सूचना लावल्यामुळे शहरांमध्ये शिस्तीचे पालन केले जात आहे. अशाच पद्धतीचा अवलंब ग्रामीण भागात यापुढील काळात करणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने सर्वसामान्य नागरिकांनी देखील यात पुढाकार महत्त्वाचा आहे. नागरिकांनी यापुढील काळात कोरोना साखळी नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Mangalvedha Prantadhikari, Tehsildar Significant reduction in the number of active patients in the taluka due to the efforts of 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा