टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी ग्रामस्थांच्या समस्या गावपातळीवरच सोडविण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला होता.
आजपासून मंगळवेढा तालुक्यातील राहिलेल्या गावात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. आज सकाळी हिवरगाव येथून या दौऱ्यास सुरुवात होणार आहे.
आज व उद्या मतदारसंघातील राहिलेल्या गावाला ते भेट देऊन आढावा घेणार आहेत. त्यांच्यासोबत तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणा सोबत राहणार आहे.
‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत गावातील रस्ते, घरकुल योजना, कृषी, पीककर्ज, विकासकामे, शिक्षण, वीज, रेशन वाटप आदी बाबींचा आढावा घेणार आहेत.
दौऱ्यात तालुकास्तरावरील सर्व अधिकारी, स्थानिक यंत्रणा, सभापती, पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. तर गावात ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित असतील.
माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे हे ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेऊन त्याबाबत प्रशासकीय यंत्रणेला सूचना देणार आहेत.
आजपासून दोन दिवस असा असेल दौरा
आज सकाळी हिवरगाव, खोमनाळ, भाळवणी, जलीहाल, हजापूर, सिध्दनकेरी, रड्डे, शिरनांदगी, मारोळी, महमदाबाद हु., लोणार व पडोळकरवाडी असा दौरा असणार आहे.
गुरुवारी दि.12 मे रोजी सकाळी 8 वाजता फटेवाडी, तळसंगी, मरवडे, येड्रॉव, खवे, जित्ती, निंबोणी, चिखल्लगी, बावची, जंगलगी, सलगर व लवंगी असा कार्यक्रम आयोजित केला आहे.
लोकाच्या समस्या गावातच सोडविण्याचा प्रयत्न
कोरोनामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांच्या समस्या गावातच सुटाव्यात, या उद्देशाने ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. लोकाच्या समस्या गावातच सोडविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. – प्रशांत परिचारक, मा.आमदार,
कोणत्याही परिस्थितीत लोकांच्या प्रश्नांसाठी तत्पर राहणार : आ.आवताडे
सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मी कायम तत्पर असून, आता रोज एका-एका गावात जावून तेथील प्रश्न समजावून घेतले जाणार आहेत. अनेक प्रश्न तेथेच सोडविण्याचा प्रयत्न असेल.
रस्ते, वीज, पाणी आदी प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कामे केली जातील असे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले आहे.
सदर गावभेट दौऱ्यामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक व आ. समाधान आवताडे यांच्यासमवेत तालुका पातळीवररील विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी सदरील गावातील ग्रामस्थांनी व नागरिकांनी आपल्या अडी – अडचणी व समस्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज