समाधान फुगारे । सुरसंगम म्युझिकल ग्रुप, म.सा.प.दामाजीनगर आणि अ.भा.मराठी नाटय परिषद शाखा मंगळवेढा यांच्या वतीने शनिवार दि.15 ऑगस्ट व रविवार दि.16 ऑगस्ट रोजी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हे दोन दिवसीय संमेलन ऑनलाईन पद्धतीने साहित्य व संगीतप्रेमींना पाहता येणार आहेत.
शनिवार दि.15 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार असून सकाळी ग्रंथपुजनानंतर 10 वाजता संमेलनाचे उदघाटन संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांचे हस्ते, संयुक्त संमेलनाचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे अध्यक्षतेखाली तसेच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.स्वाती शिंदे व स्वागताध्यक्ष अॅड.नंदकुमार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता कथाकथन कार्यक्रमाचे उदघाटन पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांचे हस्ते, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली, फॅबटेक शुगरचे चेअरमन सरोज काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
दुपारी 2 वाजता नवोन्मेेष या कवीसंमेलनाचे उदघाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांच्या हस्ते,दामाजी शुगरचे माजी चेअरमन प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली तर पांडुरंग पतसंस्थेचे चेअरमन किसन सावंजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. सायं.4 वाजता प्रकाश जडे लिखित वात्सल्यसुक्त या कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्षा अरूणा माळी यांचे हस्ते, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांचे अध्यक्षतेखाली, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य शशिकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सायं.5.30 वाजता एकपात्री अभिनय सादरीकरणाचे उदघाटन नगरसेविका अनिता नागणे यांच्या हस्ते, माजी नगरसेविका अनुराधा ढोबळे यांचे अध्यक्षतेखाली, संत दामाजीनगरचे सरपंच अॅड.दत्तात्रय तोडकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून सायं.7 वाजता काव्यरंग या कार्यक्रमाचे उदघाटन यशोदा महिला पतसंस्थेच्या चेअरमन निला अटकळे यांच्या हस्ते, जि.प.सदस्या शैला गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष अशोक माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
रविवार दि.16 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय संगीत संमेलनाचे उदघाटन आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते, संगीत संमेलनाचे अध्यक्ष मोहम्मद आयाज यांच्या अध्यक्षतेखाली व स्वागताध्यक्ष अॅड.सुजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असून सकाळी 11 वाजता शास्त्रीय गायन/वादन/नृत्य या कार्यक्रमाचे उदघाटन माजी जि.प.सदस्या अॅड.रोहिणी पवार यांचे हस्ते, इंग्लिश स्कुल ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या तेजस्विनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसेविका राजश्री टाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
दुपारी 1 वाजता उपशास्त्रीय गायन /वादन/लोकरंग या कार्यक्रमाचे उदघाटन जकराया शुगर्सचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांचे हस्ते, श्री दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगरसेवक रामकृष्ण नागणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून दुपारी 2.30 वाजता मराठी व हिंदी गाण्यांच्या ट्रॅक शो चे उदघाटन न.पा.पक्षनेते अजित जगताप यांचे हस्ते, नगरसेवक प्रविण खवतोडे यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसेवक राहुल सावंजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
सायं.5.30 वाजता संयुक्त संमेलनाचा समारोप अध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड.नंदकुमार पवार व संगीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड.सुजित कदम तसेच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सदरचे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रकाश जडे, डॉ.सुभाष कदम, दिगंबर भगरे, डॉ.शरद शिर्के, लहू ढगे,अॅड.रमेश जोशी, यतिराज वाकळे, लक्ष्मण नागणे, संभाजी सलगर, राकेश गायकवाड, प्रा.कल्पेश कांबळे, प्रा.दत्ता सरगर, दिगंबर यादव,गोरक्ष जाधव, अजय देशपांडे, वासुदेव जोशी, मयुर हजारे, अवंती पटर्धन, दया वाकडे, प्रप्फुल्लता स्वामी, रेश्मा गुंगे, भारती धनवे आदि प्रयत्नशील आहेत.
Mangalwedha Celebration of State Level Literature-Music Conference on 15th and 16th August
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज