टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील आसबेवाडी येथील ४० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महिला उपसरपंच व तिचा पती यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दि.११ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. पीडित महिलेने मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित महिला तिच्या शेतात गेली असता आरोपी म्हाळाप्पा खताळ याने तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले.
फिर्यादीस पाइपने मारहाण व शिवीगाळ केली.आरोपीच्या पत्नीस व मुलास घटना सांगण्यासाठी फिर्यादी गेले असता कुमार खताळ, युवराज खताळ, उपसरपंच शोभा खताळ यांनीही तिला दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
कार्तिकी यात्रेसाठी आपत्कालीन केंद्र
पंढरपूर कार्तिक यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी – सुविधा तत्काळ मिळाव्यात, त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही अडचण येऊ नये.
पाच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे. या सर्व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कामकाज जलद व सुरळीत व्हावे, यासाठी सांस्कृतिक भवन , प्रांत कार्यालय , पंढरपूर येथे मध्यवर्ती आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्राची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
यात्रा कालावधीत कार्तिक पत्राशेड , ६५ एकर , चंद्रभागा वाळवंट , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व नगरपालिका या ठिकाणी पाच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
भाविकांना यात्रा कालावधीत कोणतीही अडचण आल्यास मध्यवर्ती नियंत्रण कक्षाच्या ०२१८६-२२२९ ५२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा , असे आवाहनही गुरव यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज