मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे महिलेचा व तिच्या दिड वर्षाच्या मुलाचा आकस्मत विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. 25 फेब्रुवारी रोजी रात्री 8 ते दि.26 फेब्रुवारी रोजी रात्री 2 दरम्यान झाला असल्याची खबर शिवाजी ज्ञानू दोडके (वय 60 भाळवणी ता.मंगळवेढा) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,यातील खबर देणार शिवाजी ज्ञानू दोडके यांची मुलगी विश्रांती पपु मोरे (वय 25 रा.भोसे ता.मंगळवेढा) दि.25 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणावरून राहत्या असलेल्या कट्टे सर यांच्या कचरेवाडी येथील शेतातील घरातून मुलगा प्रतिक पपु मोरे (वय 1 वर्ष 6 महिने रा.भोसे ता.मंगळवेढा) याच्यासह निघून जाऊन विहिरीतील पाण्यात बुडून मुलासह मयत झाली आहे.
या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज