टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात दोन व बठाण येथे दोन अशा एकूण एकाच रात्री चार घरफोडया चोरटयांनी करून 5 लाख 28 हजाराचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडल्याने शहर व ग्रामीण भाग हादरून गेला आहे.दरम्यान,या घटनेची मंगळवेढा पोलिसात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत.
पहिला घटना
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, पहिल्या घटनेत यातील फिर्यादी गोपीचंद भोसले हे रहावयास नर्मदा पार्क येथे असून त्यांचा भांडी विक्री करण्याचा व्यवसाय असून फिर्यादीच्या बहिणीचा बेळगाव येथे धार्मिक कार्यक्रम असल्याने ते घराला कडी कुलूप लावून गेले होते.
दि.6 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वा. काशिनाथ भोसले यांनी फोन करून फिर्यादीस सांगितले तुइया घराचे कडी कोयंडा व कुलूप तोडून कोणीतरी चोरी केली आहे.
दरम्यान फिर्यादी तात्काळ मंगळवेढयात आले व त्यांनी प्रत्यक्ष पाहिले असता घराचे कुलूप कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले अडीच तोळे वजनाची सोन्याची साखळी व मण्याचे गंठण तसेच एक तोळा वजनाची सोन्याची चैन अशी जागेवर नसल्याचे दिसून आले.
दुसरी घटना
तसेच दुसर्या घटनेत शेजारी राहणारे किसन तायाप्पा मोटे हे घराला कुलूप लावून सोलापूर येथे नातेवाईकाकडे गेले होते.त्यांचेही घर अज्ञात चोरटयांनी फोडून बेडरूमध्ये ठेवलेल्या सुटकेसमध्ये एक तोळा सोन्याची पिळयाची अंगठी दिसून आली नाही.असा एकूण या दोन्ही घरामधील 1 लाख 80 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला.
तिसरी घटना
तिसर्या घटनेत बठाण येथील धनाजी महाडिक यांचे दि.5 ते 6 एप्रिलच्या दरम्यान फिर्यादीचे घर फोडून 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 4 तोळयाच्या सोन्याच्या पाटल्या तसेच 20 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 80 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
चौथी घटना
चौथ्या घटनेत फिर्यादीचा चुलता ज्ञानेश्वर महाडिक यांच्या घराची कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला तसेच फियादीचे चुलते ज्ञानेश्वर महाडिक यांच्या घराचे कडी कोयंडा उचकटून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 68 हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
दरम्यान चोरटयांनी एकाच रात्री चार घरफोडया करून 5 लाख 28 हजाराचा मुद्देमाल रातोरात पळविल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या चोरीच्या घटनेपुर्वी भालेवाडी येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत सोलापूर रामवाडी भागातील दहाजण येथे आले होते. मात्र ग्रामस्थांच्या जागरूकपणामुळे सहा जणांना रंगेहाथ पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. उर्वरीत चौघेजण कारमधून फरार होण्यात यशस्वी झाले.
तपास करणे पोलिसांना एक आव्हान
या चोरटयांचा तपास करणे पोलिसांना एक आव्हान ठरले आहे .एकाच रात्री चार घरफोडया होण्याची पहिलीच वेळ असल्याची चर्चा या घटनेवरून दिवसभर शहरामध्ये ऐकावयास मिळत होती. पोलिसांनी सायरन वाजवत रात्रीची गस्त वाढविणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
रात्रीची गस्त वाढविणे गरजेचे
पुर्वी सायरन वाजवत गस्त घालत असल्याने सायरनचा आवाज ऐकून कुटुंबिय जागे होत असल्याने तसेच सायरनच्या आवाजाने चोरटेही भिवून चोरी करण्याचे धाडस दाखवत नसल्यामुळे चोर्यांच्या प्रमाणात घट झाली होती. त्याच धर्तीवर नागरिक गस्तीची अपेक्षा व्यक्त करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज