टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढयाचे प्रांताधिकारी सध्या बेपत्ता असून त्यांची व त्यांच्या पाहुण्यांची मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी प्रहार संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
मंगळवेढा उपविभागीय कार्यालयातील अधिकारी हे गेल्या अनेक दिवसांपासून प्रांत कार्यालयाकडे फिरकले नाहीत कारण त्यांना मुंबई, पुणे, सोलापूर ऑफिस मध्ये कामकाज असते किंवा इतर ठिकाणच्या पदावरही त्यांना पदभार आहे.
त्यामुळे मंगळवेढा कार्यालयात त्यांना वेळ मिळत नाही मंगळवेढा उपविभागीय कार्यालय हे असून अडचण झाली आहे. कारण इथं प्रांतच भेटत नाही
शेतकऱ्यांना, सांगोला तालुक्यातील नागरिकांना तर हेलपाटे मारावे लागत आहेत किती किलोमीटर वरून यायचं उन्हात आणि प्रांत साहेब ऑफिसमध्ये नसल्यामुळे शेतकऱ्यांना माघारी जावे लागत आहे.
राष्ट्रीय महामार्गात जमिनी गेल्या आहेत पण मोबदला मिळत नाही असे अनेक शेतकरी राहिले आहेत कारण जे शेतकरी प्रांतांना किंवा प्रांतांच्या वर्ग केलेल्या कर्मचाऱ्याला पैसे देऊ शकत नव्हते ते पाठीमागे राहिले कारण टक्केवारी ही भरमसाठ व मोठ्या प्रमाणात होती
त्या शेतकऱ्यांवर अन्याय होत होता पैसे देण्यासाठी नसल्यामुळे ते पाठीमागे राहिले ज्यांनी दिले आहेत ते ही अडकले आहेत.
काल पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जरी खडसावले असले तरी त्या प्रांत अधिकार्यांचे पोट भरले आहे, त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही.
ते राजीनामाही देऊ शकतात किंवा बदली ही करू शकतात ते बदलीसाठी तयार आहेत पण पालकमंत्र्यांनी त्याची व त्यांच्या पाहुण्यांची मालमत्तेची चौकशी करावी एवढ्या मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतलेला
मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील पैसा कुठे गप केला याची चौकशी पालकमंत्र्यांनी करावी अशी मंगळवेढा शहरात दिवसभर चर्चा करा रंगली होती आहे.
मंगळवेढा उपविभागीय अधिकारी यांना फोन द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न मी स्वतः केला पण कधी मोबाईल बंद तर कधी ते उचलत नाहीत त्यामुळे ऑफिसमध्येही कर्मचारी प्रांत नसल्यामुळे रामभरोसे असे बिनधास्त वागत आहेत.
मंगळवेढा उपविभागीय कार्यालयात प्रांत एक महिन्यात एकदा सुद्धा दिवसभर थांबले नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रांत साहेब भेटत नाहीत त्यामुळे कार्यालय ओस पडले आहे.
एकीकडे नगरपालिकेचे प्रशासक म्हणूनही ते काम पाहत आहेत त्यामुळे इथेही मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाले आहेत नगरपालिकेमधील जे ठेकेदार टक्केवारी देतात त्यांचीच बिले लवकर निघतात त्यामुळे शहराचा विकासाच खुंटला आहे अशी परिस्थिती झाली आहे.
उन्हाळ्याची वाढती तीव्रता हे सहन करीत प्रांत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
हे सांगावे तरी कोणाला असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगावं तर ते त्यांचेच पाठ राखण करीत आहेत किंवा त्यांचेच आशीर्वाद या प्रांत साहेबांना आहेत हे परवाच्या प्रकरणात सिद्ध झाले आहे.
आशीर्वाद नसते तर टक्केवारी वाढली नसती आणि शेतकऱ्यांचे रक्त शोषण केले नसते त्यामुळे जरी प्रांत यांना दुसरी कडे पदभार दिले असले तरी त्यांनी ऑफिसमध्ये बसायला पाहिजे।
अन्यथा प्रहार संघटना याचा पाठपुरावा करेल आणि जनतेला दाखवून देईल हे कोणाच्या आशीर्वादामुळे सुरू आहे असे प्रहार संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज