टीम मंगळवेढा टाईम्स ।
आपल्या अपंग बहिणीला घरकुल बांधकामासाठी भावाने सहखुशीने अर्धा एकर जमीन मोफत दिली आहे. त्या भावाचा गटविकास अधिकारी यांनी सत्कार केला.
यात घरकुल विभागाचे सचिन येडसे यांनी गरिबांसाठी तळमळीने केलेला पाठपुरावा या त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेतून पाटखळ/ मेटकरीवाडी येथील अपंग लाभार्थी सविता नागू इरकर यांना सन 2021-22 या वर्षाकरिता प्रपत्र ड मध्ये घरकुल मंजूर झाले होते.
परंतु संबंधित लाभार्थ्याला जागा नसल्याकारणाने घरकुल बांधता येत नव्हते. संबंधित अपंग लाभार्थी सविता नागु इरकर यांना त्यांचे बंधू नागनाथ इरकर यांनी सहकुशीने सविता इरकर यांना
घरकुल बांधकामासाठी अर्धा एकर जमीन मोठ्या मनाने सहकुशीने खरेदी खत करून देण्यात आले.
त्याबाबत पंचायत समिती मंगळवेढा येथे गटविकास अधिकारी शिवाजी पाटील यांनी पंचायत समिती मध्ये नवनाथ इरकर यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे कक्ष अधिकारी इमाम मुलाणी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रामलिंग सरवदे, ग्राम सुरक्षा यंत्राचे घाडगे, भाऊसाहेब कृष्णा मिटकरी, सातव साहेब, महेश कुलकर्णी, होलार संघटना जिल्हाध्यक्ष किसन भजनावळे इत्यादी उपस्थित होते.
शिवाजी पाटील गट विकस अधिकारी पंचायत समिती मंगळवेढा तालुक्यातील ज्या घरकुल लाभार्थीस जागा नाही अशा लोकांना सामाजिक मानवतेचा धर्म या नात्याने दानशूर व्यक्तीने जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या सत्कार पंचायत समिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज