मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा वाहतूक शाखेच्या पोलीसांनी दोन चाकी व चार चाकी वाहनावर विविध केसेस दाखल करुन माहे जुलै महिना अखेर 3 लाख 35 हजार 100 रुपये इतका दंड वसूल केला असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.
दरम्यान अतिवेगाने व दारु पिवून वाहन चालविल्याप्रकरणी पाचजणाविरुध्द न्यायालयात खटले दाखल केल्याने त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
वाहतूक शाखेच्या पोलीसांनी दि.1 जुलै ते 31 जुलै अखेर मोटर सायकलवर हेल्मेट न वापरणे वाहनाला रिफ्लेक्टर नसणे, ट्रिपल सिट, नंबर प्लेट नसणे, फँसी नंबर,लायसन्स नसणे,सीट बेल्ट अशा 419 मोटर सायकलस्वारावर विविध स्वरुपात कारवाई करुन
3 लाख 35 हजार 100 रुपये इतका दंड प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अधिकारी नयोमी साटम,डी.वाय.एस.पी.विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिवाजी पांढरे, पोलीस शिपाई प्रविण जाधव, सचिन काळेल आदींनी वसूल केला.
या दरम्यान दारु पिवून व अतिवेगाने वाहन चालविल्याप्रकरणी, रस्त्यावर वाहतूकीस अडथळा येईल अशा पध्दतीने वाहन उभे करणे अशा विविध कारणास्तव 5 खटले न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
मोटर वाहन कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात मंगळवेढा न्यायालयाने दारु पिवून वाहन चालविल्याप्रकरणी 5 मोटर सायकलस्वारांना शिक्षा सुनावली आहे. सध्या मंगळवेढ्यात शाळा,महाविद्यालय सुरु झाल्याने अनेक शालेय विद्यार्थी टू व्हिलर गाड्या घेवून डबल, ट्रिपल जात असल्याचे चित्र आहे.
मोटर वाहन कायद्यान्वये 18 वर्षाच्या आत मुलांना मोटर सायकल चालविता येत नसतानाही या घटनेकडे पालकांचे दुर्लक्ष होत असल्याने आता वाहतूक शाखेच्या पोलीसांची यावर करडी नजर राहणार असून अशा घटनेत पालकांना जबाबदार धरुन त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.
पालकांनी याची खबरदारी घेवून 18 वर्षाच्या आतील मुलांना कुठलेही वाहन चालविण्यास देवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 18 वर्षाच्या आतील मुले वाहतूक नियमाबाबत अज्ञान असल्याने अपघाताला आमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे पालकांनी वेळीच दक्ष राहणे गरजेचे आहे.
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही 18 वर्षाच्या आतील मुले दिवसेंदिवस मोठ्या संख्येने टू व्हिलर घेवून शाळा, महाविद्यालयाला जात असल्याचे चित्र आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज