टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांना नव्याने कोरोनाची लागण झाल्याने आता एकूण कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या १४ वर पोहोचली असून पोलिस प्रशासनास कामकाज करण्यास कर्मचारी कमी पडत असल्याने मोठी दमछाक होत आहे.
दरम्यान दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने पोलिस दल धास्तावले आहे. मागील चार दिवसापुर्वी मंगळवेढा पोलिस ठाण्यात ८ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.
त्यानंतर पुन्हा ५ पोलिस कर्मचाऱ्यांना शुक्रवारी कोरोनाची लागण झाल्याने एकूण पॉझिटिव्ह कर्मचारी संख्या १४ वर पोहोचली आहे.
या सर्व कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सध्या पोलिस ठाण्याकडे ६५ कर्मचारी मंजूर असताना केवळ ५४ कर्मचारी कार्यरत आहेत.
त्यापैकी १४ कर्मचाऱ्यांना लागण झाल्याने कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे.
कारागृहातील ९ कैदी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नवीन तहसील कार्यालयात सुरक्षेच्या दृष्टीने हालविण्यात आल्याने तेथेही दिवसरात्र पोलिसांची डयुटी व जुन्या तहसील कार्यालयातील उपकारागृहात कैदयांच्या संरक्षणासाठी पोलिसांची २४ तास डयुटी लावली जात असल्याने मोठया प्रमाणात कर्मचारी येथे अडकून पडत आहेत.
मंगळवेढा तालुक्यात घडणाऱ्या इतर घटनातील आरोपींच्या शोधासाठी कर्मचारी कमी पडत असल्याने मोठी कसरत करून प्रशासन चालवावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज