टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळा क्रमांक ४ व प्राथमिक शाळा क्रमांक ५ मुख्याध्यापक यांच्यावर शासन नियमाप्रमाणे कामकाज न केल्यामुळे निलंबन का करण्यात येऊ नये म्हणून कारवाई करण्यात येणार आहे.
याबाबत त्यांना नोटीस देऊन खुलासा विचारण्यात आला यामध्ये त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
यामुळे या दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकावर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
नगरपालिका शाळा क्रमांक चार व पाच या मुख्याध्यापकांनी शासनाच्या आदेशाचे व नियमाचे पालन केले नाही. साठे नगर येथील शाळेतील ८० विद्यार्थी एकाच दिवशी अवैधरीत्या नागणेवाडी शाळेकडे वर्ग करण्यात आले आहेत.
याबाबत प्रकाश खंदारे यांनी तक्रार केली होती त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन शिक्षण उपसंचालक पुणे या कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले होते.
याप्रमाणे प्रशासन अधिकाऱ्यांनी चौकशी केली यामध्ये मुख्याधिकारी व प्रशासन अधिकाऱ्याचे या मुख्याध्यापकांनी आदेश न पळता अवैद्य कामकाज केले आहे.
साठेनगर येथील एका शिक्षकाला कोणाच्यातरी राजकीय दबावातून नागणेवाडी येथील शाळेत वर्ग करण्यात आले त्याच वेळी ऐंशी विद्यार्थ्यांचे दाखले एकाच दिवशी अवैधरित्या वर्ग करण्यात आले.
यामुळे साठेनगर येथील शाळा बंद पाडण्यास मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी कारणीभूत ठरले या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी प्रकाश खंदारे यांनी केली होती.
आता शासकीय पातळीवर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून या चौकशीनंतर मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
परंतु ज्या शिक्षकासाठी राजकीय दबाव आणून शिक्षकाने ही कार्यवाही मुख्याध्यापकांकडून करून घेतली त्या शिक्षकाबद्दल प्रशासनाकडून काय कारवाई केली जाणार सदर व शिक्षक परत साठेनगर येथील शाळेत सेवेत रुजू होणार का ? याबद्दलची विचारणा प्रकाश खंदारे यांनी केली आहे.
आमदार समाधान आवताडे यांचे प्राथमिक शिक्षण साठेनगर येथील शाळेत झालेले आहे. सदरहू शाळा केवळ विद्यार्थ्याअभावी बंद पडले आहे असे सांगितले जाते.
परंतु नगरपालिकेतील शिक्षकांमध्ये असलेले राजकारण व या शिक्षकांनी राजकीय नेते नगरसेवक यांना हाताशी धरून साठेनगर मधील शाळा बंद पाडून तेथील ऐंशी विद्यार्थ्यांना नागणेवाडी शाळेत वर्ग करण्यास भाग पाडले यामध्ये आता केवळ मुख्याध्यापकावर कारवाई केली जात आहे.
परंतु मुख्याध्यापकांना हे करण्यास भाग पाडणारे झारीतील शुक्राचार्य कोण ? हे शिक्षणप्रेमींना समजले पाहिजे आता हे प्रकरण निस्तरण्यासाठी शुक्राचार्य पुढे येतील का ? याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज