मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.दलितमित्र कदम गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज १ ते ४ मे दरम्यान मंगळवेढा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अॅड. सुजित कदम यांनी दिली.
इंग्लिश स्कूलच्या मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात असून आज १ मे रोजी दुपारी चार वाजता स्व.कदम गुरुजी व स्व.ताड अप्पा यांच्या प्रतिमेची मिरवणूक मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्या उपस्थितीत व शिवाजीराव पवार यांच्या हस्ते निघणार आहे.
२ मे रोजी सकाळी आठ वाजता कृषी क्रीडाज्योत दौड व सायकल रॅलीचे कदम गुरुजी स्मारक ते ताड मळा दरम्यान आयोजन करण्यात आले.
या रॅलीचे उद्घाटन अॅड. नंदकुमार पवार यांच्या हस्ते व अजित जगताप यांच्या आले उपस्थितीत होणार आहे. सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन आवताडे शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय आवताडे यांच्या हस्ते, डॉ. शरद शिर्के व डॉक्टर प्रीतो शिर्के यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सायंकाळी सहा वाजता सूरसंगम प्रस्तुत मराठी, हिंदी गीतांच्या कराओके शोचे उद्घाटन खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते होणार असून, यावेळी पवन महाडिक व डॉ.नितीन तोष्णीवाल यांची उपस्थिती राहणार आहे.
३ मे रोजी सकाळी नऊ वाजता मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन तहसीलदार मदन जाधव यांच्या हस्ते, अल्पसंख्याक सेलचे लतीफ तांबोळी व डॉ. पद्माकर अहिरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सायकाळी सहा वाजता ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित वपाटील यांच्या हस्ते व पोलिस निरीक्षक रणजित माने व डॉ.विजय मोरे यांच्या हस्ते होणार आहे.
४ मे रोजी सकाळी नऊ वाजता भजन आयोजित करण्यात आले आहे. तर १२ वाजता ‘भीमा’चे अध्यक्ष विश्वराज महाडिक व कुलगुरू एस. के. पवार यांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी होणार आहे.
दुपारी १२.१५ वाजता केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कृषी उद्योजक मेळावा व महोत्सवाचा समारोप होणार आहे. अध्यक्षस्थानी आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत हे असणार आहेत.
यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार शहाजी पाटील, आमदार राजेंद्र राऊत, माजीआमदार प्रशांत परिचारक, प्र. कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, प्रा. शिवाजीराव सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, सचिव प्रियदर्शनी कदम महाडिक, संचालिका डॉ. मीना कदम, तेजस्विनी कदम, श्रीधर भोसले, राम नेहरवे, अजिता भोसले, शिवाजी पाटील, अमीर हमजा भालदार, यतिराज वाकळे ज्यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज