टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये १८ पैकी १३ जागा बिनविरोध झाल्या असून ५ जागेसाठी ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत,
या निवडणुकीमध्ये उभ्या असलेल्या उमेदवारांना दि.२१ एप्रिल रोजी चिन्हांचे वाटप करण्यात आले,
यामध्ये सहकारी संस्था महिला राखीव मतदारसंघातून सौ.संगीता सुरेश कट्टे याना विमान, सौ.कविता संजय बेदरे व सौ.सविता प्रदीपकुमार यादव याना कपबशी चिन्ह मिळाले आहे.
ग्रामपंचायत-सर्वसाधारण मतदारसंघातून गंगाधर बसगोंडा काकनकी व जगन्नाथ बापू रेवे यांना कपबशी तर सोमनाथ महादेव माळी यांना विमान चिन्ह मिळाले आहे.
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून पांडुरंग हरी कांबळे यांना कपबशी, हौसाप्पा बापू शेंबडे यांना विमान व वैभव सायबु सोनवणे यांना किटली हे निवडणूक चिन्ह मिळाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ए. ए. गावडे यांनी दिली.
आमदार समाधान आवताडे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे बबनराव आवताडे यांनी १३ जागा बिनविरोध करून बाजार समितीवर एकहाती वर्चस्व कायम ठेवले आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत चुलत्या-पुतण्यांनी एकत्र येऊन पुन्हा सत्ता स्थापन केली. मात्र, पाच जागांसाठी नऊ उमेदवार आखाड्यात राहिल्याने निवडणूक लागली आहे.
बिनविरोध संचालक
संस्था मतदारसंघातून विष्णुपंत आवताडे, सिद्धेश्वर आवताडे, सुशील आवताडे, नानासाहेब चोपडे, मनोज चव्हाण, प्रकाश जुंदळे, धन्यकुमार पाटील, सहदेव लवटे, बिराप्पा माळी,
व्यापारी मतदारसंघातून बबनराव अवताडे, बसवंत पाटील, हमाल तोलार मतदारसंघातून प्रवीण कौडूभैरी, ग्रामपंचायत मतदार संघातून आनंद बिले बिनविरोध निवडून आले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज