टीम मंगळवेढा टाईम्स ।
फेब्रुवारी महिना आज संपत आहे आणि मार्च महिन्यात अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. काही नियमांचा तुमच्या खर्चाच्या योजनेवर परिणाम होऊ शकतो.
१ मार्चपासून सोशल मीडिया, बँक कर्ज, एलपीजी सिलिंडर आणि इतर गोष्टींबाबत मोठ्या बदलाची शक्यता आहे.
त्याचबरोबर भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. मार्चमध्ये कोणते नवीन नियम लागू होतील आणि ते तुमच्या मासिक खर्चावर कसा परिणाम करू शकतात ते जाणून घेऊयात.
बँक कर्ज महागणार रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरात वाढ केली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी त्यांचे MCLR दर वाढवले आहेत. याचा थेट परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होईल. ईएमआयचा बोजा आणि कर्जाचे वाढते व्याजदर यामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ शकतो.
एलपीजी आणि सीएनजीचे दर वाढले
एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीसाठी गॅसचे दर प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला निश्चित केले जातात. गेल्या वेळी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली नसली तरी यंदा सणासुदीच्या निमित्ताने दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रेल्वेच्या वेळापत्रकात बदल उन्हाळा जवळ येताच भारतीय रेल्वे ट्रेनच्या वेळापत्रकात काही बदल करू शकते. मार्चमध्ये ही यादी सार्वजनिक केली जाऊ शकते. मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्चपासून ५ हजार मालगाड्या आणि हजारो प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते.
बँक सुट्टी मार्चमध्ये होळी आणि नवरात्रीसह १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये बँकांच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.
सोशल मीडिया अटी आणि नियमांमध्ये बदल – भारत सरकारने अलीकडेच आयटी नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. आता ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइट्सना नवीन भारतीय नियमांचे पालन करावे लागणार आहे.
धार्मिक भावना भडकावणाऱ्या पोस्टसाठी नवीन धोरण प्रभावी ठरणार आहे. नवीन नियम मार्चमध्ये लागू होऊ शकतो. चुकीच्या पोस्टमुळे वापरकर्त्यांना दंड देखील होऊ शकतो.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज