टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू झाली आहे.
आता नागरीकांना या योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणार असल्याची माहिती संचालक डॉ. शरद शिर्के यांनी दिली आहे.
केसरी व पिवळे रेशनकार्ड असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महिलांच्या विविध आजारांवर ऑपरेशनची सोय उपलब्ध असून बालरोग विभाग, जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र,
ऑर्थोपेडिक अँड ट्रामा विभाग, मेडिसिन विभाग , अस्थिरोग विभाग, सोनोग्राफी व एक्स-रे विभाग त्वचारोग विभाग आदी सर्व सुविधा आता एकाच छताखाली मिळणार आहेत.
दरम्यान, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पिवळे व केसरी कार्ड यांच्याकडे आहे त्या फॅमिली मधील किंवा कुटुंबीयांमधील हाडाचे फॅक्चर झाले तर संपूर्ण उपचार मोफत आहेत लहान मुलांसाठी फोटोथेरेपी तसेच काचेत बाळ ठेवणे संपूर्ण मोफत आहे.
याकामी भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, आ.समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असल्याची माहिती संचालक डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील गरजू व तळागाळातील लोकांना दर्जेदार व मोफत उपचार उपलब्ध करून त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित स्वरूपात गेल्या ४ वर्षांपासून राबविण्यात येत आहेत.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत १२०९ उपचारांकरिता प्रति वर्ष, प्रति कुटुंब रु. ५ लक्ष पर्यंतचे वैद्यकीय संरक्षण तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ उपचारांकरिता प्रति वर्ष, प्रति कुटुंब रु. १ लक्ष ५० हजार पर्यंतचे व मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी रु. २ लक्ष ५० हजार पर्यंतचे वैद्यकीय संरक्षण उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैध शिधापत्रिका/ फोटो ओळखपत्र व आयुष्मान कार्ड (PMJAY साठी) ची आवश्यकता आहे.
आपणास या योजनेमध्ये उपचारपूर्व तपासण्या, वैद्यकीय उपचार, प्रत्यारोपण साहित्य, शस्त्रक्रिया, रुग्णालयातील वास्तव्य, जेवण हे निःशुल्क उपलब्ध आहेत. उपचारानंतर परतीचा प्रवास खर्च योजनेअंतर्गत दिला जातो. या योजनांतर्गत हृदय शस्त्रक्रिया, मूत्राशयाचे आजार, हाडाचे विकार, फुफ्फुसाचे विकार, कॅन्सर अशा १८३ उपचारांसाठी पाठपुरावा सेवादेखील मोफत दिली जाते.
सदर योजनेच्या योग्य व प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच . आरोग्यमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत हे वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन व प्रोत्साहित करीत असतात.
योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्राहक सेवा केंद्राच्या १५५३८८/१८००२३३२२०० किंवा १४५५५/१८००१११५६५ या क्रमांकावर निःशुल्क संपर्क साधावा तसेच www.jeevandayee.gov.in व www.pmjay.gov.in या वेबसाईट वर भेट द्या. आपणास व आपल्या कुटुंबियांस उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा. -डॉ.शरद शिर्के
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज