टीम मंगळवेढा टाईम्स।
परदेशातील प्रगत शेती अभ्यासण्यासाठी राज्य सरकारतर्फे १२० शेतकऱ्यांना १५ देशांचा अभ्यास दौरा घडविणार आहे. परदेश दौऱ्यासाठी जिल्ह्यातून ४३ जणांनी अर्ज केले होते. यासाठी सोलापूर जिल्ह्यातून ३ शेतकऱ्यांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात आली.
या लॉटरी पध्दतीने काढलेल्या योजनेसाठी समितीने काम पाहिल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गवसाणे यांनी दिली. निवड झालेल्यात मंगळवेढ्याचे राजकुमार शंकर चेळेकर, पंढरपूरचे महेश बाळकृष्ण बिस्किटे, तर बार्शीतून प्रकाश शिवाजी पाटील यांचा समावेश आहे.
आधुनिक प्रगत शेती पध्दती आणि तंत्रज्ञान अभ्यासले जाणार आहे. देशांची नावे जाहिर झाली नसली तरी युरोपीय देशांचा या मध्ये प्रामुख्याने समावेश आहे. देश आणि भेटीचा कालावधी राज्य पातळीवरुन जाहीर होणार आहे.
राजकुमार चेळेकर यांच्या लॉटरी पध्दतीने झालेल्या निवडीबद्दल तालुका कृषी अधिकारी जी.एस. श्रीखंडे, सहाय्यक कृषी अधिकारी अश्विनी शिंत्रे सर्व कर्मचाऱ्यांसह शहर व ग्रामीण भागातून शेतकरी वर्गातून, तरुण पिढीतून चेळेकर यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज