टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील बनशंकरी कॉलनीतील ढगे कुटुंबीय बंगल्याला कुलूप लावून उपचारासाठी दवाखान्यात गेले होते.
दरम्यान, चोरट्यांनी भर दिवसा कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.
तसेच चोरट्यांनी याच परिसरात राहणारे शिंदे यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी श्रीकांत ढगे हे शहरातील बनशंकरी कॉलनीत वास्तव्यास असून, दि. ६ रोजी त्यांचे वडील आजारी असल्याने फिर्यादी हे वडील व आई यांना घेऊन आंधळगाव येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी गेले होते.
दरम्यान, ते उपचार करून रात्री आठ वाजता घरी परतले असता त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. घरात जाऊन पहिले असता कपाटात ठेवलेले 52 हजार पाचशे रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच सोन्याचे दागिने असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे आढळले.
ढगे यांच्याप्रमाणेच नागणे प्लॉटमधील शुभम ज्ञानेश्वर शिंदे यांच्या घरी अज्ञात चोरट्याने घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज