मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डमी शिक्षिका प्रकरणाच्या चौकशीसाठी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता यांनी सदर शाळेस प्रत्यक्ष भेट देवून या घटनेच्या मुळाशी जावून चौकशी केली. तसेच शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांना कारणेदाखवा नोटीस पाठविल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डमी शिक्षिका कार्यरत असल्याने मुलांच्या अध्यापनाचा प्रश्न गंभीर होवून मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार

असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात झळकताच गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता यांनी दि.१० डिसेंबर रोजी सदर शाळेस प्रत्यक्षात भेट दिली.

शाळा व्यवस्थापन समितीने ठराव करुन सदर महिला शिक्षिकेला स्वयंसेवक म्हणून नेमले असल्याचे मेहता यांनी सांगीतले.

तसेच ती शिक्षिका मानधनवर काम करत असुन सर्व शिक्षक स्वयंस्फुर्तीने वर्गणी गोळा करुन तिला मानधन दिले जात असल्याचे सांगीतले.

शाळेतील बाळासो कोष्टी हे शिक्षक दि.८ डिसेंबर पासून रजेवर असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. रजेवर असल्याचा अहवाल देणे अपेक्षित असताना तो दिला नाही. त्यामुळे सदर शिक्षकाला नोटीस बजावण्यात आली आहे.

सदर शाळेला अधिकाऱ्यांनी भेट दिल्यावर ती शिक्षिका अनुपस्थित असल्याचे दिसून आले. मुळ शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आल्या असून या घटनेचा सविस्तर अहवाल जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पाठविण्यात आला असल्याचे गटशिक्षणाधिकारी मेहता यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगीतले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










