टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील सुरसंगम ग्रुप, ढगे डिजिटल व राजेश खन्ना फॅन्स यांनी आज पंढरपूर रोडवरील हॉटेल सुगरण (लॉन्स) येथे सायंकाळी 6 वाजता स्व.राजेश खन्ना यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुछ तो लोग कहेंगे या सदाबहार हिंदी गाण्याचा ट्रॅक शो आयोजित केला आहे.
प्रसिध्द अभिनेते, निर्देशक-निर्माता तथा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त स्व.राजेश खन्ना यांचा चाहता वर्ग मोठा असल्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
वैवाहिक जोडप्यांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था
दरम्यान, आज पाऊस आल्यास हा कार्यक्रम हॉलमध्ये होणार आहे. तसेच वैवाहिक जोडप्यांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार
बॉलीवूड सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आहेत. अनेकांप्रमाणे त्यांच्याही आयुष्यात अनेक चढ- उतार आले. पण प्रत्येक संकटांना ते सामोरे गेले.
पहिला सिनेमा होता ‘आखिरी खत’
राजेश खन्ना यांनी १९६६ मध्ये ‘आखिरी खत’ हा पहिला सिनेमा केला. यानंतर त्यांनी बऱ्याच सिनेमात काम केलं.
१९६९ मध्ये प्रदर्शित झालेला आराधना हा सिनेमा यशस्वी ठरला. या सिनेमातील गाणी आणि अभिनयासाठी राजेश खन्ना यांना प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळाली होती.
राजेश खन्ना यांनी ‘आनंद’ सिनेमात अमिताभ बच्चन यांना तोडीस तोड काम केलं. त्या कामासाठी आजही प्रशंसा केली जाते. इथून त्यांनी बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार म्हणून स्वत: ची ओळख निर्माण केली.
त्यांचा डायलॉग झाला प्रसिद्ध
‘आनंद’ सिनेमात राजेश खन्ना यांचा डायलॉग होता ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं’. लोकांसाठी ही जगण्याची फिलॉसफी ठरली.
एकामागोमाग यशस्वी सिनेमामुळे अल्पावधीत ते तरुणींच्या गळातले ताईत झाले. राजेश यांची एक झलक पाहता यावी म्हणून मुली वाट्टेल ते करायला तयार असायच्या.
तरुणी त्यांच्या इतक्या प्रेमात असायच्या की, एकदा तर ते आजारी पडले होते. तेव्हा दिल्लीतल्या महाविद्यालयातील तरुणींनी त्यांची प्रकुती सुधारावी म्हणून त्यांच्या पोस्टरलाच बर्फाने शेक दिला होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज