टीम मंगळवेढा टाईम्स ।
बनावट दस्त तयार केला व तोतया इसम उभा करुन जमीन नावावर करुन घेतल्याप्रकरणी खरेदीदार राजकुमार महादेव रजपूत व सिध्दापूरचा कोतवाल दत्तात्रय कोळी या दोघांना पोलीसांनी अटक करुन न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील फिर्यादी संजय रजपूत (रा.सिध्दापूर) यांची जमीन बनावट दस्त नोंदणी करुन संजय रजपूत यांच्या जागी तोतया इसम उभा करुन दि.13 जून 2022 रोजी यातील आरोपी राजकुमार रजपूत याने सदर जमीन नावावर करुन घेतली होती.
बनावट दस्त बनविताना ओळख देणेकामी मनोहर कोळी व पैगंबर मकानदार यांनी साक्षीदार म्हणून सही केली आहे.
बनावट दस्त बनविण्यामध्ये सिध्दापूर येथील कोतवाल दत्तात्रय महादेव कोळी यांनी मदत केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
तपाशीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांनी वरील दोन्ही आरोपींना दि.23 जानेवारी रोजी अटक करुन न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दि.30 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान यापुर्वीही बनावट दस्त नोंदणीचा प्रकार घडल्याने एका लेखणीकाला जेलची हवा खाण्याची वेळ आली होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज