टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील येड्राव येथे १६ वर्षीय विवाहित मुलीचा विहिरीतील पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून कोमल सौरभ येलपले असे मृत मुलीचे नाव आहे.
दरम्यान, या घटनेची पोलिसात नोंद झाली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील मयत कोमल येलपले ही दि.२३ रोजी सकाळी ११.०० वा. शेतातून घास गवत घेवून येते असे तीच्या सासरा सुधाकर येलपले यास सांगून गवत आणण्यासाठी गेली.
दि.२४ रोजी सकाळी ९ .०० च्या दरम्यान तीचा मृतदेह विहिरीतील पाण्यात आढळून आला.याची खबर रितेश यलमार याने दिल्यावर या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज