टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे स्वामी विवेकानंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आणि स्वातंत्र्यवीर विठू केरू गवळी मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने
उद्या शनिवारी दि.९ एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी सभापती संभाजी गावकरे यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यातील वाढती बेरोजगारी पाहता गरजू युवकांना नोकरी मिळावी या उद्देशाने गोणेवाडी सारख्या लहान गावात विविध कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
याद्वारे १० वी , १२ वी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण तसेच सर्व शाखांच्या पदवीधारक युवकांना मुलाखती घेऊन नोकरीची संधी मिळवून दिली जाणार असल्याचे गावकरे यांनी सांगितले.
यासाठी प्राचार्य नंदकुमार व्हरे, विष्णू गवळी , रमेश माने , विलास गवळी ,परमेश्वर मासाळ आदी प्रयत्नशील आहेत . इच्छुकांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज