टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरात एका ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करण्याचा बहाणा करून 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात दोन महिलाविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी सचिन पाटील यांचे शहरातील शिवप्रेमी चौकात मेघराज ज्वेलर्स या नावाचे दुकान असून
दि.28 रोजी दुपारी 3.20 वा. अंदाजे 30 ते 35 वयोगटातील दोन महिला या दुकानात सोने खरेदी करण्यासाठी आल्या होत्या.
यावेळी फिर्यादीची पत्नी दुकानात असताना त्यांची नजर चुकवून 35 हजार रुपये किमतीचे कोईमतूर झुबा स्टॉप्स जोड चोरून त्या अनोळख्या दोन महिलांनी नेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, त्या दोन अनोळखी महिलांचे फोटो सी.सी.टि.व्ही.कॅमेरात कैद झाले असून पोलिस त्या छायाचित्राच्या माध्यमातून त्यांचा कसून शोध घेत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज