टीम मंगळवेढा टाईम्स।
गेल्या अनेक वर्षापासून मंगळवेढा शहरांमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यासह महिलांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवणाऱ्या जय जवान गणेशोत्सव मंडळाच्या आढावा बैठकीत
यंदाच्या गणेशोत्सव मंडळाचा कारभार महिलांच्या हाती देण्याचे ठरले यामध्ये मंडळाच्या अध्यक्षपदी विद्या गुंगे उपाध्यक्षपदी कोमल गायकवाड व सचिवपदी जस्मीन मुजावर यांची निवड एकमताने करण्यात आली
तर सदस्य म्हणून मनीषा दत्तू, रूपाली कसगावडे, संगीता आवताडे, सोनाली घुले, कल्पना जठार,अश्विनी कदम, वर्षारानी मोरे,उज्वला गणेशकर,अर्चना केंदुले, हेमलता नकाते,संगीता शिंदे, लता चव्हाण यांचा समावेश करण्यात आला.
यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यात प्रथमच सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकारी म्हणून महिलांना संधी मिळालेली आहे त्यामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज