मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
राष्ट्रीय महामार्गात बाधीत शेतकर्यांच्या पाईपलाईनची मंजूर रक्कम देण्याकामी सात हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणातील अटकेत असलेले आरोपी तलाठी सुरज रंगनाथ नळे व येथील प्रांत अधिकारी यांनी
कोटयावधी रुपयाची अवैध रितीने टक्केवारीच्या माध्यमातून माया गोळा केली असल्याने यांची संपूर्ण संपत्तीच्या चौकशीची मागणी फिर्यादी संजय गेजगे यांनी सोलापूर येथील लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे.
सांगोला येथील शेतकऱ्याच्या जमिनीतून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने पाईपलाईनची मंजूर रक्कम देणेकामी सात हजाराची लाच तलाठी सुरज नळे यांनी स्विकारल्याने दि.29 रोजी त्यांच्यासह एका झीरो कर्मचार्यास लाचलुचपत विभागाच्या पोलीसांनी अटक केली होती.
महामार्गातील बाधीत शेतकर्यांना मंजूर रक्कमा देण्यासाठी टक्केवारी लावून प्रांत अधिकारी व तलाठी यांनी कोट्यावधीची माया गोळा केली असल्याचा गेजगे यांचा आरोप आहे.
या घटनेतील खरे मास्टरमाईंड प्रांत असताना तपासाधिकार्यांनी नुसती वरवरची चौकशी करुन त्यांना सहीसलामत मोकळे सोडले आहे. या चौकशीसाठी बँकेचे फुटेज तपासले नाहीत.
तसेच कोरे चेक याचीही कसून चौकशी केलेली नसल्यामुळे तपास म्हणावा तसा झालेला नसल्याने हा तपास सी.आय.डी. खात्याकडे वर्ग करण्यात यावा अशी ही गेजगे यांनी मागणी केली आहे.
तलाठी नळे यांनी बँकेतील कर्मचार्याला हाताशी धरुन कोरे चेक सेल्फ म्हणून वटविले असतानाही याची चौकशी न करता तपास अधिकार्यांनी याला बगल दिली आहे.
परिणामी प्रांत अधिकारी मास्टर माईंड असतानाही पुरावा सापडत नसल्याचे कारण देवून त्यांना सहीसलामत मोकाट सोडल्याचा आरोप गेजगे यांनी तक्रारीत केला आहे.
नळे यांनी मंगळवेढा,पंढरपूर,भद्रावती (जि.चंद्रपूर) व इतर नातेवाईक यांच्या नावे मालमत्ता केली आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे.
तर प्रांत अधिकारी यांनी जंगम व स्थावर मालमत्ता, बँकेतील रोख रक्कम पुणे, माळशिरस, पंढरपूर, उरळीकांचन येथील चौकशीची मागणी केली आहे.
नागसेन चंदनशिवे (रा.कमलापूर),सिध्देश्वर कांबळे (रा.कमलापूर), शारदा भिमराव होवाळे (दामाजीनगर), दर्याबा बंडगर (अनकढाळ) यांनी चौघांनी सोलापूर येथील लाचलुचपत विभागाकडे पुराव्यानिशी प्रांत अधिकार्यांच्या विरोधात
तक्रारी करुनही याची तपास अधिकार्यांनी चौकशी केली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार सहाय्यक पोलीस आयुक्त अँटीकरप्शन ब्युरो सोलापूर यांचेकडे दि.27 रोजी लेखी स्वरुपात केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज