टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनामुळे दोन वर्षांच्या निर्बंधातून मुक्त झालेले भाविक यंदा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करणार आहेत. त्याला लोकांचाही मोठा प्रतिसाद लाभत आहे.
‘गणपती बाप्पा मोरया.. ‘च्या जयघोषात आज बुधवार ३१ ऑगस्ट २०२२ रोजी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच पोलीस प्रशासनही सज्ज झाले.
नियम व अटींचे पालन करून आनंदी उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा ठरणार आहे.(स्रोत:लोकमत)
मंडळांनो बक्षीस मिळवा
यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक उपक्रमावर भर द्यावा , असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. याशिवाय निसर्गपूरक, शिस्तप्रिय व कोणालाही सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मंडळांना पोलीस ठाणे स्तरावर बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होऊन बक्षीस मिळवावे, असे आवाहन पोलिसांकडून होत आहे
सर्व नियम व अटींचे पालन करावे
शासन व पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियम व अटींच्या अधीन राहून जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा. कोणालाही त्रास होणार नाही , याबाबत पुरेपूर काळजी घ्यावी . दहा दिवसांच्या कालावधीत सार्वजनिक उपक्रम राबवावेत गरिबांना मदत करावी.- तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक , सोलापूर ग्रामीण
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज