मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
भारताने चांद्रयान – ३ मोहिमेच्या निमित्ताने जगात इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश असून चंद्रावर यशस्वीरित्या यानाची सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला आहे.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या आहेत
अखंड भारतासाठी हा महत्त्वाचा क्षण असल्याचं सांगत त्यांनी हा क्षण भारतासाठी नवी चेतना देणारा ठरणारा असल्याचं सांगितलं.
मोदी म्हणाले…
जेव्हा आपण आपल्या डोळ्यांच्या समोर इतिहास घडताना पाहतो तेव्हा जीवन धन्य झाल्याचे दिसते. हा चिरंजीवी क्षण आहे.
हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण अद्भुत आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे.
हा क्षण अवघड महासागराला पार करण्याचा आहे. हा जिंकण्याच्या नव्या वाटेचा आहे. हा क्षण १४० कोटी लोकांच्या आशेचा आहे. नव्या चेतना आणि उर्जेचा आहे. नव्या भारताचा आहे.
मोदी म्हणाले, मी ब्रिक्समध्ये आहे. पण आता प्रत्येक भारतीयासारखं माझं मनही चांद्रयान-३ मध्ये गुंतलेलं आहे. मी खूप आनंदी आहे. देशवासियांसोबत आनंद साजरा करण्यासाठी उत्सूक आहे.
मी इस्त्रो, देशातल्या सर्व शास्त्रज्ञांना शुभेच्छा देतो. ज्यांनी गेल्या काही वर्षांपासून मेहनत घेतली आहे. त्यांचे आभार मानतो. १४० जनतेला कोटी कोटी धन्यवाद देतो.
आपल्या शास्त्रज्ञांचे परिश्रम खूपच प्रेरणादायी आहे. जिथं कुणीही गेलं नाही तिथं आपण गेलो. आता यापुढे चंद्राविषयीच्या अनेक गोष्टी बदलून जातील. याचे कारण भारत आहे. चंद्राला मामा म्हणतो, चंदा मामा बहूत दूर के है, असे म्हटले जायचे. आता तो दिवस जवळ आले आहे. चंदा मामा एक टूर के है….
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज