mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ICC T20 World Cup : भारताचा झिम्बाब्वेवर मोठा विजय; उपांत्य फेरीत असेल ‘यांच्याशी’ मुकाबला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 6, 2022
in राष्ट्रीय
IND vs BAN T20 WC: थरारक सामन्यात भारताचा विजय; सेमीफायनलचा मार्ग सुकर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

T20 विश्वचषक सुपर 12 च्या शेवटच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या टीम इंडियाने 5 विकेट्सवर 186 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 115 धावांत गारद झाला. मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला गेला. केएल राहुलने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. तो 51 धावा करून बाद झाला. दुसरीकडे, सूर्यकुमार यादव 61 धावांवर नाबाद राहिला.

T20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि झिम्बाब्वेचे संघ प्रथमच आमनेसामने आले होते. याआधी उभय संघांमध्ये सात T20 सामने खेळले गेले ज्यात भारताने पाच जिंकले तर दोनमध्ये बांगलादेश विजयी झाला.

झिम्बाब्वेबरोबर सामना जिंकल्यानंतर आता उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लडशी असणार आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत तगड्या टीमसोबत भारताचा सामना रंगणार आहे.

भारताची कमजोरी पुन्हा समोर आली
पुन्हा एकदा भारताला दमदार सुरुवात करता आली नाही. भारताला पहिला धक्का रोहित शर्माच्या रूपाने 27 धावांवर बसला. रोहितला केवळ 15 धावा करता आल्या.

तथापि, भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे केएल राहुल फॉर्ममध्ये परतला आहे आणि त्याने 35 चेंडूत 51 धावा केल्या. झिम्बाब्वेविरुद्ध कोहलीही राहुलला जास्त वेळ साथ देऊ शकला नाही आणि 26 धावा करून बाद झाला. यानंतर काही वेळातच राहुलच्या रूपाने भारताला 95 धावांवर तिसरा धक्का बसला.

सूर्यकुमार यादवची बॅट तळपली

राहुलनंतर सूर्यकुमार यादवची बॅट जोरदार तळपली. या फलंदाजाने आपल्या ओळखीच्या तुफानी शैलीत धावा केल्या. सूर्यकुमारने 25 चेंडूत 61 धावा केल्या. या खेळीत त्याने सहा चौकार आणि चार षटकार मारले.

टीम इंडियाने शेवटच्या 5 षटकात 79 धावा केल्या आणि यासह झिम्बाब्वेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात टीम इंडियाला यश आले. या पाच षटकांत भारताने फक्त एक विकेट गमावली.

पंतला संधी साधता आली नाही
राहुल पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर काही वेळातच ऋषभ पंतही 3 धावा करून बाद झाला.

दिनेश कार्तिकच्या जागी पंतला या स्पर्धेत प्रथमच संधी देण्यात आली होती, मात्र या संधीचे तो फायदा घेऊ शकला नाही. पंत सपशेल अपयशी ठरला.

झिम्बाब्वेसाठी 187 धावांचे लक्ष्य खूपच कठीण होते. यासाठी त्याला चांगली सुरुवात हवी होती जी त्याला मिळाली नाही. भारतीय गोलंदाजांनी त्यांचा अर्धा संघ 36 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता.

T20 विश्वचषक सुपर 12 च्या शेवटच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 17.2 षटकांत 115 धावांत गारद झाला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भारत विजयी

संबंधित बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
Next Post
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

सोलापूर जिल्ह्यासाठी पोलीस भरतीची जाहिरात निघाली, इतक्या आहेत रिक्त जागा; 'या' तारखेपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

August 31, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

August 31, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा