mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

एल के पी मल्टीस्टेट ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक गती व चालना देण्याचे काम करते; आ.शहाजी पाटील व दीपकआबा साळुंखे यांचे प्रतिपादन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 29, 2022
in सोलापूर
एल के पी मल्टीस्टेट ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक गती व चालना देण्याचे काम करते; आ.शहाजी पाटील व दीपकआबा साळुंखे यांचे प्रतिपादन

टीम मंगळवेढा टाईम्स। 

ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक गती व चालना देण्याकरिता सांगोला तालुक्याच्या पूर्ण टोकाला वसलेल्या हंगीरगे ता. सांगोला येथे एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेचा लोकार्पण सोहळा अलोट गर्दी व उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.

आपल्या मानदेशी डायलॉग मुळे सर्वत्र प्रसिद्ध पावलेले सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार एड.शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते तर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या मल्टीस्टेटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

यावेळी उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी बोलताना सांगितले की, सूर्योदय उद्योग समूहाने सांगोला तालुका व सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये

आजवर उभ्या केलेल्या अनेक उद्योगधंद्यांमधून शेकडो तरुणांच्या हाताला काम मिळाले असून सूर्योदयाच्या या तरुणांचा आदर्श आज सर्वांनी घेण्याची गरज आहे.

संस्थापक अनिल इंगवले यांचा बँकिंग आणि उद्योग क्षेत्रामधील आजवरचा थक्क करणारा प्रवास समाजातील सर्व तरुणांकरिता प्रेरणादायी आहे.

सोलापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील काही शासकीय व सहकारी वित्तीय संस्था अडचणीतून जात असताना  जिथे आर्थिक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत , छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ज्या ग्रामस्थांना दूर जावे लागत होते.

अशा ग्रामीण भागातून नव्या उमेदीने व विशिष्ट ध्येयाने एलकेपी मल्टीस्टेट सारखी संस्था आर्थिक सेवा सुविधा देण्याकरिता पुढे सरसावलेली आहे.

ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले व त्यांचे जोडीदार भगत गुरुजी,

बंडोपंत लवटे व दिघे गुरुजी यांच्या कामाची खूप मोठी धडाडी असून समाजातील नेमकी गरज ओळखून कितीतरी व्यवसाय व उद्योगधंदे आजवर त्यांनी उभे केलेले आहेत.

तीन तालुक्याच्या सीमेवर असलेले हंगिर्गे हे गाव तालुक्यापासून खूप दूर अंतरावर असून अशा प्रकारच्या वित्तीय संस्थेची या ठिकाणी खूप मोठी गरज होती.

ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा ओळखून आपण काम करत आहात ही बाब प्रशंसनीय आहे. हे गाव आणि आजूबाजूच्या पाच दहा गावातील व्यवसायिकांना आपण माफक दरात कर्जपुरवठा करून

या भागातील उद्योग आणि व्यवसायाला उभारी द्यावी अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली. उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांनीही स्वच्छ व पारदर्शी कारभार करत ग्राहकांना जास्तीत जास्त लोकाभिमुख सेवा देण्याबाबत सूचना केल्या.

व संस्थेच्या होत असलेल्या प्रगतीला आणि शाखा विस्ताराला शुभेच्छा दिल्या. यावेळी मंचावर ज्येष्ठ नेते किसन आबा गायकवाड, हंगेरगे गावचे सरपंच साबळे, मा. जि प सदस्य अनिल भाऊ मोटे, घेरडीचे सरपंच पिंटू पूकळे,

रासपचे नेते सोमा आबा मोटे, दिलीप मोटे, उद्योजक संजय साळुंखे ,महादेव दिघे, बिभीषण सावंत, बाबुराव वाघ ,मधुकर कोळेकर ,सदाशिव सावंत, दादासाहेब सावंत, बंडू साबळे ,श्रीकृष्ण काटे, आबासो काटे ,

रामभाऊ पूकळे ,दादासो सावंत, वसंत सावंत, सुभाष सावंत ,दिलीप सावंत, विनायक कुलकर्णी सर ,डॉ. सुशीलकुमार शिंदे ,अशोक सावंत, डॉ.सचिन काळे,

सुरेश काटे सर ,बीराजी घु, श्रीनिवासदादा करे ,अमोघसिद्ध कोळी ,चंद्रकांत करांडे ,कोमल सातपुते ,कांचन चव्हाण ,दत्तात्रय मळगे, विजयकुमार पोरे, सर्जेराव वाघ ,विलास पावणे, बाबुराव पूकळे ,दीपक बंदरे साहेब ,रामचंद्र लांडगे,

अशोक चोरमले, हरीबा गावडे, नितीन सावंत , पोपट गुजले, अशोक गावडे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये संस्थेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी या भागात मल्टीस्टेटची शाखा उभारण्या पाठीमागील भूमिका विशद केली व संस्थेविषयी सखोल माहिती आणि संस्थेमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या ग्राहकयोगी सुविधा यांची माहिती सांगत ठेवीच्या देखील विविध प्रकारच्या योजना त्यांनी समोर मांडल्या.

शेवटी उपस्थित सर्वांचे आभार संस्थेचे संचालक जगन्नाथ भगत यांनी मांनले.  गावातील मुख्य बाजारपेठेमध्ये  पुरेशी इमारत, त्यामध्ये सुसज्ज व अत्याधुनिक फर्निचर,

कार्यक्रमासाठी आकर्षक स्टेज, हलग्यांचा कडकडाट, फटाक्यांची आतिषबाजी , ड्रोन कॅमेरा चे चित्रण , महिला वर्ग ,युवक वर्ग, ज्येष्ठ मंडळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांची खूप मोठी उपस्थिती यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असलेली व महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र असलेली संस्था या भागात उभारल्यामुळे परिसरांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: एल के पी मल्टिस्टेट

संबंधित बातम्या

सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
Next Post
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

खळबळजनक! मंगळवेढ्यात अनैतिक संबंधाची खोटी माहिती का सांगते याचा जाब विचारणार्‍या महिलेच्या डोक्यात घातला दगड; एका महिलेविरूद्ध गुन्हा

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा