टीम मंगळवेढा टाईम्स ।
परपुरूषासोबत अनैतिक संबंध असल्याची खोटी माहिती का सांगते अशी विचारणा करणार्या मरवडे येथील 30 वर्षीय महिलेस
दगडाने डोक्यात मारून गंभीर जखमी करून शिवीगाळी दमदाटी केल्याप्रकरणी मंगळवेढा ग्रामीण रूग्णालय परिसरात राहणारी आसमा हिच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रानी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी ही मरवडे येथील असून तीचे पती भंडारकवठे ता.दक्षिण सोलापूर या ठिकाणी शासकीय दवाखान्यातील 108 अॅब्युलन्स गाडीवर चालक म्हणून आहे.
मागील पंधरा दिवसापासून फिर्यादीच्या पतीस मोबाईलवर मंगळवेढा येथील आरोपी आसमा ही सदर फिर्यादीचा पती चालकाच्या मोबाईलवर वारंवार तुझी पत्नी दुसर्या एका पुरूषासोबत अनैतिक संबंध ठेवत असल्याचे सांगितल्याने
फिर्यादीच्या पतीने याबाबत पत्नीकडे चौकशी केली असता माझे कोणत्याही परपुरूषाबरोबर अनैतिक संबंध नसल्याचे समजावून फिर्यादीने पतीस सांगितले होते.
तदनंतरही पुन्हा आरोपी आसमाने फिर्यादीच्या पतीस फोन करून तुझी पत्नी वाईट वागत असल्याचे सांगितले.
यावर दि.28 रोजी सकाळी 10 वाजता फिर्यादी ही साक्षमोक्ष करण्यासाठी मंगळवेढा ग्रामीण रूग्णालयजवळ आरोपीच्या राहते घराजवळ येवून
माझ्या पतीस तू फोन करून माझे दुसर्या पुरूषासोबत अनैतिक संबंध आहेत असे खोटे का सांगते? अशी विचारणा केली असता
तू कोण मला विचारणारी असे म्हणून खाली पडलेला दगड हातात घेवून डोक्यात मारून फिर्यादीस जखमी केले. त्
यावेळी डोक्यातून मोठया प्रमाणात रक्तप्रवाह होवू लागल्याने शेजारील उपस्थित लोकांनी पळत येवून सदरची भांडणे सोडवासोडवी केली
व फिर्यादी ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचार करून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास आले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास मंगळवेढा शहरचे पोलिस हवालदार हजरत पठाण हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज